मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. (श्रीमती) नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहारअर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत, उप सचिव विलास आठवले, राजेश तारवी, सभापतीचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव संतोष पराडकर रवींद्र जगदाळे, सुनील झोरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस यशवंत हाप्पे, संगीत दिग्दर्शक श्रवणकुमार राठौर, सांगली वैभव पतसंस्था अध्यक्ष पी आर पाटील, सांगली सहकारी बँक संचालक उत्तमराव माने यांनी स्व.वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0000