‘कोरोना काळात मातृशक्तीचे योगदान विशेष उल्लेखनीय’: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
15

मुंबई, दि. 3 : कोरोना काळात डॉक्टर्स, दानशूर व्यक्ती, पोलीस, स्वच्छता कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांनी मनोभावे काम केले. मात्र रुग्णांजवळ कुणीही जाण्यास धजावत नसताना डॉक्टर्स, निवासी डॉक्टर्स, नर्सेस व रुग्णसेवक या लोकांनी जीवावर उदार होऊन जनसेवा केली. मातृशक्तीने कोरोना काळात दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय होते, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 34 डॉक्टर्स, औषध निर्माण कंपन्यांचे प्रतिनिधी,  पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच समाजसेवकांना आज राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ‘महाराष्ट्र स्टेट चॅम्पियन ऑनर्स’ प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

ह्युमॅनिटरियन वेल्फेअर ॲन्ड रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने कोरोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षा क्रिस्टीन स्वामीनाथन व आरती नोटीयाल व्यासपीठावर उपस्थित होत्या.

यावेळी डॉ.वर्नोन वेल्हो, डॉ. श्रीनिवास चव्हाण, डॉ. विनायक सावर्डेकर, डॉ.भूषण वानखेडे, डॉ. दिनेश कुडवा आणि डॉ. चंद्रिका कुडवा, डॉ. अनिरुद्ध अर्जुन माळगावकर, डॉ. आशुतोष खटावकर, डॉ. भरत पाठक, डॉ. पल्लवी सिंग, श्री. दारा पटेल, श्री. सौरभ कुमार गुप्ता, श्रीमती छाया अविनाश कुबल, डॉ. अनिल के मुरारका, श्री. सुरेश अग्रवाल, श्री. रोहित वर्मा, श्री. भालचंद्र बर्वे, श्री. एस के सिंग, श्री. विकास शर्मा, श्री. पराग छापेकर, श्री. सुभाष शंकर पुजारी, श्री. योगेश आधार शिवडे, श्री. मुकुंद परशुराम काळे, श्री. सखाराम धुरी, श्री. रायझन स्वामीनाथन, श्रीमती सुप्रिया विजय वाघमारे, श्रीमती प्रेमलता लक्ष्मीकांत मौर्य, श्री. शशांक धनंजय रावले, श्री. संतोष भागवत राऊत, श्री. प्रदीप (राजू) मोरे, श्री. सुनील नारायण पाटील, श्री. अजित अनिल कुलकर्णी, श्रीमती सीमा एम. अडसूळ यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.