Home महाराष्ट्र ‘नॅब’ला राज्यपालांकडून 10 लाखांची मदत जाहीर

‘नॅब’ला राज्यपालांकडून 10 लाखांची मदत जाहीर

0

मुंबई, दि. 14 : दृष्टिहीन विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी लागणारे वाढीव शासकीय अनुदानकर्णबधीर व बहुविकलांग केंद्राला लागणारे अर्थसहाय्य तसेच कौशल्याधारित शिक्षण घेणाऱ्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळवून देण्याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करूतसेच विशेष बी.एड. अभ्यासक्रमाला सामान्य बी.एड. अभ्यासक्रमाप्रमाणे समकक्ष मान्यता देण्याबाबत देखील आपण चर्चा करू असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले.

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब ) या दृष्टिहीन व्यक्तींच्या शिक्षणप्रशिक्षण व रोजगारासाठी कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे आयोजित अंधांसाठीच्या अखिल भारतीय ध्वज निधी संकलन मोहिमेचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.   

दृष्टीहीन व विकलांग व्यक्ती अनेक क्षेत्रात चांगली प्रगती करीत आहेत. मात्र तरीही दिव्यांग लोकांचे प्रश्न सामान्य लोकांपेक्षा भिन्न आहेत. सुदैवाने आपल्या देशात अनेक लोक व नॅबसारख्या संस्था दिव्यांगांसाठी चांगले काम करीत आहेत. असे नमूद करून राज्यपालांनी नॅबला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

अपघातात मृत झालेल्या व्यक्तींचे डोळे दृष्टीहिनांसाठी उपलब्ध व्हावे

            रस्ते अपघातात मृत झालेल्या व्यक्तींचे डोळे दृष्टीहीन व्यक्तींना विनाविलंब उपलब्ध होण्याबाबत कायद्यात तरतूद करावी अशी मागणी यावेळी नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी केली.

यावेळी नॅबचे उपाध्यक्ष सूर्यभान साळुंकेमहासचिव गोपी मयूरसनदी लेखापाल विनोद जाजूसहसचिव भावेश भाटिया,  मुक्तेश्वर मुनशेट्टीवारमंगला कलंत्री आदी उपस्थित होते. 

error: Content is protected !!
Exit mobile version