नॅचरोपॅथीच्या न्याय हक्कासाठी हायकोर्टात जाणार : डॉ.मुलाणी

0
9

आयुष भारत पदाधिकाऱ्यांना मिळणार दिलासा

सोलापूर,दि.27 : नॅचरोपॅथीच्या न्याय आणि हक्कासाठी आयुष भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आमिर मुलानी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आयुष भारत संघटना डॉक्टरांच्या न्यायहक्कासाठी देशभर लढत आहे आयुर्वेद होमिओपॅथी युनानी इलेक्ट्रो होमिओपॅथी नॅचरोपॅथी व अन्य पॅथीच्या न्याय आणि हक्कासाठी आयुष भारत देशभर झटत आहे पण नॅचरोपॅथी डॉक्टरांवर ती अनेक वेळा महाराष्ट्रात बोगस डॉक्‍टर म्हणून कारवाई करण्यात आल्या आहेत यामध्ये बऱ्याच कारवाई चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्या आहेत नॅचरोपॅथी डॉक्टर आपल्या नावासमोर डॉक्टर उपाधी लावण्यास पात्र आहे अशी घोषणा देखील राज्य शासन केंद्र शासन तसेच माननीय सुप्रीम कोर्ट व माननीय हायकोर्ट तालुका न्यायालय जिल्हा न्यायालय या व्यतिरिक्त बऱ्याच राज्यातील राज्य सरकार व न्यायालय यांनी देखील नॅचरोपॅथी आपल्या नावासमोर डॉक्टर उपाधी लावू शकतात असे निकाल देण्यात आले आहेत तरीही जिल्हा पातळीवर ती शहानिशा न करता काही अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे ही कारवाई थांबवण्यासाठी आयुष भारत संघटने कोर्टाचे आदेश राज्य शासनाचे आदेश केंद्र शासनाचे आदेश जोडून वेळ वेळ पत्रव्यवहार केले आले आहेत तरीही महाराष्ट्र मध्ये चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असतील तर कारवाई थांबवणे खूप गरजेचे आहे या कारवाईमध्ये विनाकारण डॉक्टरांची बदनामी होते व मानसिक आर्थिक नुकसान होते व या गोष्टींचा नाहाक त्रास होतो तसेच पॅथीची देखील बदनामी होते. तसेच महाराष्ट्र मध्ये आरोग्य अधिकाऱ्यांकडून तालुका जिल्हा पातळीवर ती न्यायालयाचा अवमान केला जात आहे. या गोष्टीचा दाद मागण्यासाठी आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे आयुष भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अमिर मुलानी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.