१७ ते १९ मे दरम्यान फोर्ट संकुलातील दीक्षान्त सभागृहात छायाचित्र प्रदर्शन

0
13

श्रीमान बाळासाहेब ठाकरेचित्र आणि चरित्र विषयावर छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई, दि. ०3 मे: मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, सार्थ प्रतिष्ठान आणि मुंबई न्यूज फोटोग्राफर असोसिएशन यांच्या सयुंक्त विद्यमाने श्रीमान बाळासाहेब ठाकरे: चित्र आणि चरित्र या विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. दिनांक १७ ते १९ मे २०२२ दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ०७ या वेळेत हे छायाचित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची दूर्मिळ छायाचित्रे या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात येतील. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय, सामाजिक, कला-क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांसोबत झालेल्या बैठका, जाहिर सभा अशा अनुषंगिक विषयांवरील दूर्मिळ छायाचित्रे या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात येतील. यासाठी आयोजकांमार्फत १९३४ पासूनच्या कालावधीपासून महाराष्ट्रातील सुप्रसिध्द १०० छायाचित्रकारांची निवडक १५ छायाचित्रे मागविण्यात आली होती. यातील १५०० छायाचित्रांतील निवडक ७० छायाचित्रे या प्रदर्शनात ठेवण्यात येतील. अध्यासन केंद्रामार्फत छायाचित्रकारांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे.  सर्वांसाठी खूल्या असलेल्या या छायाचित्र प्रदर्शनास इच्छूकांनी भेट द्यावी असे आवाहन या अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांनी केले आहे.

याबरोबरच ‘स्वातंत्र्योत्तर मुंबई: जडणघडण व विकास’ या विषयावर आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या छायाचित्रांचे तसेच निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन १७ ते १९ मे २०२२ च्या दरम्यान सकाळी १० ते सध्यांकाळी ७ वाजेपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित केले जाणार आहे.