एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अर्थकारण !

0
119

इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा दावा
                                                                                                                                    मुंबई,दि.२५ जून २०२२ –राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यामुळे जनता मेटाकुटीला आहे.पंरतु, या राजकीय अस्थिरतेमागे अर्थकारण जबाबदार आहे, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. विद्रोहाला राज्यभरातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागचे ७०० ते ८०० कोटींचे अर्थकारण कारणीभूत असल्याचे पाटील म्हणाले. शिवसेनेतील आमदारांच्या या बंडाने संपूर्ण राज्य व्यापला आहे. शिंदे यांच्यासोबत ठाणे,औरंगाबादेतील प्रत्येकी ५, मुंबई, जळगावचे प्रत्येकी ४, रायगडचे ३, उस्मानाबाद, सातारा, बुलढाण्याचे प्रत्येकी २, कोल्हापूरचे २ आणि नांदेड, पालघर, सिंधुदुर्ग, यवतमाळ, सांगली, नाशिक आणि सोलापूर येथील प्रत्येकी १ आमदार गेला आहे.

कोरोनाकाळामुळे राज्यातील बदल्या गेल्या दोन वर्षांपासून रखडल्या होत्या. आता बदल्यांच्या माध्यमातून कमाई करण्याची संधी आमदारांना दिसत होती. पंरतु, उद्धव ठकारे यांनी बदल्यांचे सर्व अधिकार आणि फाईली आपल्याकडे घेतल्याने आमदारांमधील खदखद आणखी वाढली. साधारणत: १,२,३ वर्गााच्या बदल्या मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी वाटून घेतलेले असतात. बदल्यांची वेळ येते तेव्हा मंत्रालयातील अधिकारी त्यांचे एजेंट आणि मंत्र्यांचे एजेंट फिरत असतात. पीडब्ल्यूडी, जलसंपदा, महसुल,परिवहन मंत्रायातील बदल्यांसाठी मोठी बोली लागते.दरम्यान गेल्या महिन्यात २३ मे रोजी पीडब्ल्यूडी मंत्रालयात घाईघाईने बदल्या करण्यात आल्या. पंरतु, ज्या अधिकाऱ्यांनी बोली लावून देखील त्यांच्या बदल्या झाल्या नाही अशांनी ही बाब मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहचवली. यानंतर २७ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी सर्व बदल्यांवर स्टे दिला.

प्रत्येक शिवसेनेच्या मंत्र्यांची फाईलची पडताळणी त्यानंतर होवू लागली. त्यामुळे आमदारांमधील असंतोष वाढू लागला. त्यातच गुलाबराव पाटील आणि बच्चू कडू नाराज झाले. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेवून बंडाचे षडयंत्र रचल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे स्वप्न भंग झाले असा दावा बंडखोरांनी केला असला तरी अर्थकारणच त्यामागे कारणीभूत असल्याचा दावा पाटील यांनी केला. भाजप सोबत घरोबा करण्याची भाषा करणारे शिंदेचे २०१४ मध्ये भाजपसोबत युती तोडण्याची भाषा करीत होते,असे पाटील म्हणाले.