प्रा. रामकृष्ण मोरे जीवन गौरव आणि कृतज्ञता पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न

0
21

पुणे,दि.09ः-रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रा. रामकृष्ण मोरे जीवनगौरव आणि कृतज्ञता पुरस्कार प्रदान समारंभ 8 नोव्हेबंरला एस. एम.जोशी सभागृह, पुणे येथे संपन्न झाला.रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठानच्या वतीने कृतिशील व प्रयोगशील शिक्षणतज्ञ माजी शिक्षण मंत्री प्रा.रामकृष्ण मोरे यांच्या नावाने जीवनगौरव आणि कृतज्ञत्ता पुरस्कार दिला जातो. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, पत्रकारिता, संप्रदाय, या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना प्रा.रामकृष्ण मोरे यांच्या जन्मदिनी म्हणजे दिनांक ८ नोव्हेंबर या दिवशी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार कुस्ती क्षेत्रातील उल्लखनीय कार्याबद्दल प्रा.बाळासाहेब लांडगे यांना तर कृतज्ञत्ता पुरस्कार कुस्ती, सहकार, संप्रदाय, समाजकारण, राजकारण या क्षेत्रात गेली ६० वर्षे सातत्याने महत्वपूर्ण योगदान देणारे माजी खासदार विदुरा विठोबा तथा नानासाहेब नवले यांना बिहार विधानपरिषदेचे सभापती देवेश्चंद्र ठाकूर यांच्या हस्ते आणि मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उस्थितीत प्रदान करण्यात आला. जेष्ठ साहित्यीक डॉ. सदानंद मोरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

देशाच्या स्वातंत्र्यंचे अमृत महोत्सवी वर्षे तसेच प्रा.रामकृष्ण मोरे सरांच्या अमृत महोत्सवी जयंतीचे औचित्य साधून प्रा.रामकृष्ण मोरे यांचे समावेत अनेक वर्षे राजकारण, समाजकारण, शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या माजी मंत्री अनंतराव थोपटे,माजी मंत्री अँड. मदनशेठ बाफना,मा.खा.अशोक आण्णा मोहोळ.मा.आ.कृष्णराव भेगडे,.मा.आ.सूर्यकांत काका पलांडे,मा.आ.अँड राम कांडगे,मा.आ.दिलीप ढमढेरे,मा.आ.अँड. संभाजीराव कुंजीर,.मा.आ.गन्नाथ बापू शेवाळे यांना यावेळी विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी आज मी इथे उभा आहे ते रामकृष्ण मोरेंमुळे असे गौरवोद्गार देवेश्चंद्र ठाकूर यांनी व्यक्त केले. तर बोलणाऱ्या सर्व मान्यवरांनी दिवंगत प्रा.मोरे सरांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्राची कुस्ती ऑलम्पिक मध्ये पोहोचावी अशी अपेक्षा जेष्ठ साहित्यीक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.

जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पगडी, उपरणे, गाथा, तुळशीचे रोप, श्री.विठ्ठलाची प्रतिमा, मानपत्र आणि रू.२५ हजार रोख असे होते.यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कृषी क्षेत्राशी निगडित अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष उल्हासदादा पवार यांनी केले. तर, आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव मंदार चिकने यांनी व्यक्त केले. संस्थेचे उपाध्यक्ष संजय बालगुडे यांनी सूत्रसंचालन केले.