Home Top News हिवाळी अधिवेशन:सीमाप्रश्नावरून विरोधक आक्रमक, महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात जाण्यापासून का अडवले?- पवार

हिवाळी अधिवेशन:सीमाप्रश्नावरून विरोधक आक्रमक, महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात जाण्यापासून का अडवले?- पवार

0

नागपूर- हिवाळी अधिवेशनास सुरुवात होताच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आंदोलन केले.आंदोलनानंतर महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

सरकारने भूमिका स्पष्ट करावी

अजित पवार म्हणाले, आज कर्नाटकात जाण्यापासून महाराष्ट्रातील नेत्यांना रोखले आहे. आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा होता. मात्र, त्या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. महाराष्ट्र एकीकरण समितीचा मंडपही कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही कर्नाटक सरकारची सीमाभागात दादागिरी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही गप्प का आहेत?, असा सवाल केला.


Exit mobile version