Home महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रदान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रदान

0

सांगली दि. 28 :- महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्यासह महिला व बाल विकास  क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते लता विष्णू पाटील (विश्रामबाग सांगली), शोभाताई निवृर्ती होनमाने (देवराष्ट्रे), सविता विश्वनाथ डांगे (उरूण इस्लामपूर) आणि डॉ. निर्मला सुधीर पाटील (उत्तर शिवाजीनगर सांगली) या महिलांचा सन्मान करण्यात आला. 10 हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

या कार्यक्रमात सांगली जिल्हा कृषी महोत्सवात घेण्यात आलेल्या पौष्टीक तृणधान्य पाककला स्पर्धेतील विजेत्या अपर्णा कोडलकर, मीना हेमंत चौगुले, डॉ. वैशाली दिलीप माने यांनाही पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.  तसेच कोरोनामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना 10 लाख रूपये त्यांच्या नावे बँकेत जमा केल्याबाबतच्या पासबुकाचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.  

प्रतिक्षा बागडीने जिल्ह्याचा क्रीडा लौकिक वाढविला – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली जिल्ह्याची कन्या प्रतिक्षा बागडी हिने पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजयश्री मिळवून मानाची गदा पटकावून क्रीडा  क्षेत्रात सांगली जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी तिला वैयक्तिक एक लाखाचा धनादेश देऊन गौरविले. ‍ ऑलम्पिक स्पर्धेस व भावी कारकिर्दीस पालकमंत्री डॉ. खाडे यांनी प्रतिक्षा बागडीला  शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार उपस्थित होते.

Exit mobile version