Home महाराष्ट्र छोटी वृत्तपत्रे ग्रामीण भागातील प्रसारशक्ती आहेत – आ. थोरात

छोटी वृत्तपत्रे ग्रामीण भागातील प्रसारशक्ती आहेत – आ. थोरात

0

संगमनेरातील संपादक राज्य परिषदेने राज्यातील संपादकांना संघटीत केले

संगमनेर- कोरोना सारखे कितीही संकटे आली व सोशल माध्यमांची स्पर्धा कितीही वाढली तरी मुद्रित माध्यमांचे महत्व कधीही कमी होणार नाही. वृत्तपत्रांनी उथळ बातम्या देण्याऐवजी विश्‍लेषणात्मक लेखन आपल्या वृत्तपत्रातून करावे आणि ती काळाची गरज आहे. सध्या राजकारणाचा दर्जा झपाट्याने घसरला आहे. अशा वेळी माध्यमांनी सवंग लोकप्रियतेसाठी धावणार्‍या वाचाळ नेत्यांना माईक व लेखनी बंदी करावी तरच माद्यमांचा दर्जा टिकवून राहील. आज एखादी संघटना स्थापन करणे व ती चालविणे महाकठीण काम आहे. परंतू संपादक किसन भाऊ हासे संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून छोट्या वृत्तपत्राचे नेतृत्व जिद्दीने करीत आहेत. ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई संघटनेच्या वतीने  रविवारी संगमनेरात संपादक राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ. थोरात बोलत होते.  व्यासपीठावर माजी. आ. डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. वि.ल. धारूकर, संघटनेचे अध्यक्ष किसन भाऊ हासे, अ‍ॅड. इलियास खान, डॉ. हेमंत जोशी, डॉ. नामदेवराव गुंजाळ, संपादीका सौ. सुशीला हासे, जिल्हाध्यक्ष मनोज आगे, सचिव नरेंद्र लचके, संपादक जयपाल पाटील  तर दुसर्‍या सत्रात प्रमुख पाहुणे आ. सत्यजीत तांबे उपस्थित होेते.
पुढे बोलतांना आ. थोरात म्हणाले की, ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या घडामोडी व जनतेचे प्रश्‍न सरकारपुढे मांडण्याचे काम छोटी वृत्तपत्रे करतात. या छोट्या वृत्तपत्रांच्या अनेक समस्या आहे. संपादक किसन भाऊ हासे संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्‍नांसाठी शासन स्तरावर नेहमी संघर्ष करीत असतात. आमचा त्यांच्या संघर्षाला नेहमी पाठिंबा असतो.   वृत्तपत्रे हे उथळ बातम्यांपेक्षा सविस्तर व विश्‍लेषणात्मक घटना जनते पर्यंत पोहचवित असल्यामुळे त्यांचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. वृत्तपत्रांनी काळानरूप बदल करून बातम्यांबरोबरच  विश्‍लेषणात्मक लेखन अग्रक्रमाणे करावे अशी अपेक्षा आ. थोरात यांनी व्यक्त केली. संपादकांनी आपल्या प्रश्‍न संदर्भात आपआपल्या जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींकडे, प्रशासनाकडे सविस्तर निवेदन द्यावे. आम्ही राजकीय पक्ष म्हणून विधिमंडळात या प्रश्‍नावर सरकारला जाब विचारू असे आश्‍वासन दिले.  राज्यातील विविध भागातून संपादक संगमनेरात परिषदेसाठी आले होते. हासे यांच्या माध्यमातून या संपदकांशी आपल्याला हितगूज साधता आले असे मत यावेळी त्यांनी व्यक्त करीत संघटना बांधणी व वाटचालीसाठी  शुभेच्छा व्यक्त केल्या.
संपादक परिषदेचे प्रास्तविक किसन भाऊ हासे यांनी करतांना सांगितले की, राज्यात सुमारे अडीच हजारांपेक्षा  जास्त छोटी वृत्तपत्रे प्रकाशित होतात.  सरकारचे ध्येय, धोरण, योजना ग्रामिण भागातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम भांडवली वृत्तपत्रांपेक्षा हे छोटे वृत्तपत्र करीत असतात मात्र शासन जाहिरात वाटप धोरणात याच छोट्या वृत्तपत्रांवर अन्याय करीत असतात. जाचक नियम, अटी लावून या छोट्या वृत्तपत्रांवर निर्बंध लादण्याचे काम सरकारकडून केले जाते. त्यामुळे न्याय हक्कांसाठी संघटीतपणे मुकाबला करण्यासाठी संपादक व पत्रकार सेवा संघ सातत्याने लढा देत आहे. अधिस्विकृती कमिटीमध्येही जाणीवपूर्वक छोट्या वृत्तपत्रांवर अन्याय केला जातो. हा अन्याय दुर करण्यासाठी यापुढे आपल्याला अधिक जोमाने लढावे लागेल अशी भावना यावेळी संपादक किसन भाऊ यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे  वृत्तपत्र विद्या व जनसंवाद माजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर यांनी वृत्तपत्राचे महत्त्व, समस्या व त्यांच्याकडून असणार्‍या अपेक्षा यावेळी सविस्तर विस्तृत केल्या. छोटी वृत्तपत्रे म्हणजे ग्रामीण भागाचा आरसा असतात. ग्रामीण भागातील छोटे- मोठे प्रश्‍न ऐरणीवरून आणून त्यांचे निरसन करण्यासाठी शासनावर दबाव आणण्याचे काम छोटी वृत्तपत्र करीत असतात. विकासाचे व प्रगतीचे अडकवून पडलेले प्रवाह खुले करण्याचे काम प्रामुख्याने छोटी वृत्तपत्र करत असताता. लोकशाहीचे रक्षक असणार्‍या माध्यमांनी कुणाच्या डोक्यासमोर नतमस्तक होऊ नये. तंत्रज्ञानाबद्दल आंधरात राहू नका, अंधळेपणाने कोणाचीही बाजू घेऊ नका, आज जग छोटे झाले आहे. आपली एक छोटी बातमी सुद्धा जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन खळबळ उडवू शकते. छोट्या वृत्तपत्रांसमोर, तंत्रज्ञान, मुद्रण, वितरण, जाहीरात हे मुख्य प्रश्‍न असले तरी तुम्ही समाजाचे छोटे-मोठे प्रश्‍न मांडल्यास समाज आपल्या पाठीशी उभा राहील. अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आ. सत्यजीत तांबे यांनी छोट्या वृत्तपत्रांचे महत्त्व विशद करत त्यांच्या प्रश्‍नांसाठी आपण शासन दरबारी लढा देऊ असे अश्‍वासन दिले. सौ. दुर्गाताई तांबे, बाळासाहेब आंबेकर, मनोज आगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवावार्ताचे कार्यकारी संपादक सुदीप हासे यांनी केले तर आभार नरेंद्र लचके यांनी मानले.  यावेळी केशवराव तुपे – छ. संभाजीनगर, प्रफुल्ल नेवे -जळगाव, अ‍ॅड. इलियास खान – जालना, पीआर पाटील -लातूर, विजय लक्ष्मण पवार – कोल्हापूर, धनश्री पालांडे – रत्नागिरी, चंद्रकांत खंडेलवाल- गोंदिया, राजेंद्र दणके – पुणे,  विलास डोळसे -बीड, उद्धव बाबर – सातार, हेमंत जोशी – पालघर, अनिरूद्ध बडवे – सोलापूर, उत्तम काळे – परभणी, मधुकर बावणे – नागपूर, हिवारज उके – भंडारा, नरेश गुजराथी -नाशिक व इतर जिल्ह्यातील संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दैनिक युवावार्ता परिवार, संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतल

error: Content is protected !!
Exit mobile version