वाकी येथे ‘सत्यशोधक संवाद सभा’ उत्साहात संपन्न.
राहुल गायकवाड (विशेष प्रतिनिधी) : राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव दिना निमित्त सत्यशोधक बहुउद्देशीय सामाजिक संस्था महा. राज्य च्या वतीने ‘सत्यशोधक कार्यकर्ता निर्माण अभियान अंतर्गत”सत्यशोधक संवाद सभेचे’ आयोजन वाकी,ता. बारामती,जि. पुणे येथे रविवार दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी सायं ५:०० वाजता करण्यात आले होते.सत्यशोधक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि प्रमुख उपस्थितांचे स्वागत लेझीम पथकाच्या गजरात करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात बहुजन महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन तसेच दिप प्रज्वलीत करुन करण्यात आली.सदर संवाद सभेमध्ये ‘सत्यशोधक समाज स्थापनेचे ध्येय- उद्देश,सत्यशोधक चळवळीचा इतिहास,वर्तमान आणि भविष्यकालीन संकल्पना,उपक्रम.’ या विषयावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष विशाल धेंडे यांनी मार्गदर्शन करताना महापुरुषांच्या संकल्प पूर्तीसाठी शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेतीत प्रामाणिक ईमानदार कार्यकर्त्यांच्या हाताला काम पोटाला अन्न मुलांना शिक्षण आणि कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण हि जबाबदारी घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानी सत्यशोधक पत्रकार,कार्यकर्त्यांची फौज निर्माण करण्याचा संकल्प केल्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाडे सर यांनी तर प्रास्ताविक पुरोगामी लेखक,सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरविंद जगताप यांनी केले. सेवानिवृत्त आर.टी.ओ. अधीकारी डॉ. मधुकर वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रपिता जोतिराव फुले यांना सत्यशोधक समाजाची स्थापना का करावी लागली याचे विश्लेषण केले.उपसरपंच हनुमंत जगताप यांनी राष्ट्रपिता जोतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी सुरु केलेल्या पहिल्या शाळेचे महत्व,तत्कालीन परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती हा महत्वपूर्ण विषय मांडला.कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्याचा जाहीरनामाचे कार्यकारी संपादक सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेश गायकवाड,सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरविंद जगताप यांनी केले होते.आयोजकांनी सर्व मान्यवरांचा सत्यशोधक चळवळीची पुस्तके आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.याप्रसंगी सजीव संरक्षण आणि जागृती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र महाडीक,पत्रकार सुशील गायकवाड,सत्यशोधक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव राहुल गायकवाड,संस्थापक सदस्या प्रज्ञा गायकवाड,संस्थापक सदस्या रेखा धेंडे तसेच ग्रामस्थ,कार्यकर्ते उपस्थित होते.