एहसास, शायरी आणि गजलचा कार्यक्रम गेट वे ऑफ इंडिया येथे संपन्न

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई दि. 27 : अल्पसंख्याक विकास विभाग व महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने गेट वे ऑफ इंडिया येथे एहसास, शायरी, गजल, सुफी या कार्यक्रमाचे आयोजन काल दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी आमदार रईस शेख, अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीत व राज्यगीतच्या गायनाने करण्यात आली. प्रधान आय. ए. कुंदन सचिव यांनी मंत्री श्री. सत्तार यांचा सत्कार केला. तसेच श्री. सत्तार यांनी इतर मान्यवरांचा सत्कार यावेळी केला. यावेळी विविध क्षेत्रातील कलावंतांनी त्यांचे कलेचे सादरीकरण केले. उर्दू संस्कृती, साहित्य आणि वारसा असा एक अप्रतिम मिलाप पाहण्यासाठी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.