६९ सहा.पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती…

0
225
गोंदिया,दि.१०ः- दि. ७/०५/२०२१ च्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीच्या कोटयातील पोलीस निरीक्षकांची सर्व रिक्त पदे दिनांक २५/०५/२००४ च्या स्थितीनुसार सेवाज्येष्ठतेने भरण्यात येत असून, दि.२५/०५/२००४ नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना त्यांच्या मुळ सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार विभागीय पदोन्नती समितीने सहायक पोलीस निरीक्षक यांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी दि.२१/०३/२०२३ रोजी पात्रता तपासुन सन २०२२-२३ ची निवडसूची तयार करण्यात आलेली आहे.
 
   सामान्य प्रशासन विभाग,शासन निर्णय दि.१५.१२.२०१७ व दि.३०.०८.२०१८ मधील तरतुदीनुसार मोहोरबंद लखोट्यात ठेवण्यात आलेल्या एकूण १३५ प्रकरणांचा आढावा घेण्यात आला असून त्या अनुषंगाने या कार्यालयाचे ज्ञापन दि.२२.०१.२०२५ अन्वये ४१ सहायक पोलीस निरीक्षकांचे व न्यायालयीन प्रकरणातील सपोनि. धोंडिबा हरिभाऊ घावटे यांची दि.०३.०१.२०२५ अन्वये अशा एकूण ४२ सहायक पोलीस निरीक्षकांचे महसूल विभाग पसंती मागविण्यात येऊन त्यांना महसूल विभाग वाटप करण्यात आलेला आहे.

उपरोक्त ४२ सहायक पोलीस निरीक्षकांना, त्यांनी कार्यभार ग्रहण केलेल्या दिनांका पासून “पोलीस निरीक्षक” पदावर पदोन्नतीवर त्यांची पदस्थापना करण्यास पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ यांनी मान्यता दिली आहे.


न्यायालयीन प्रकरणे सुरू असलेल्या २७ अधिकाऱ्यांना देखील पदोन्नती

नियुक्ती प्राधिकारी यांनी पदोन्नतीसाठी पात्र ठरलेल्या २७ सहायक पोलीस निरीक्षक यांना ११ महिन्यासाठी किंवा त्यांचेविरुध्दचे न्यायालयीन प्रकरण अंतिम होईल,यापैकी जे अगोदर होईल तेवढ्या कालावधीसाठी  अटींच्या अधिन राहून पोलीस निरीक्षकपदी निव्वळ तदर्थ पदोन्नती देण्याचा जाणीवपुर्वक निर्णय घेतला आहे.
शिस्तभंग विषयक,न्यायालयीन कार्यवाहीच्या अधिन राहून दिली जाणारी तदर्थ पदोन्नती केवळ तात्पुरती असेल व या तदर्थ पदोन्नतीमुळे नियमितपणाचे व ज्येष्ठतेचे कोणतेही लाभ अशा अधिकारी यांना मिळणार नाहीत, ही पदोन्नती पुढील आदेशापर्यंत असेल तसेच कोणत्याही वेळी दिलेली तदर्थ पदोन्नती रद्द करून मूळ पदावर पदावनत करण्याचा हक्क शासन राखून ठेवीत आहे.असे ह्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.