अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून; राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी सादर होणार

0
44

मुंबई: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार आहे. हे अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. तर विधानसभा आणि विधानपरिषदेत या दोन्ही सभागृहात 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. रविवारी विधानभवनात आयोजित विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या अर्थसंकल्पात लाडक्‍या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्‍याचे आश्‍वासन महायुती सरकार पुर्ण करणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. अधिवेशनाच्या कामकाजाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार 8 मार्च सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहाणार आहे. तर 13 मार्च होळीनिमित्त कामकाजास सुटी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतरचे हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.