प्रा. रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कार डॉ. प्रा. तारा भवाळकर यांना

0
63

 सांगली-राम कृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रा. रामकृष्ण मोरे जीवनगौरव आणि कृतज्ञता पुरस्कार प्रदान केला जातो. समाजकारण, राजकारण, शिक्षण, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य, कला, कृषी आशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींना जीवनगौरव आणि कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.हा विशेष सोहळा भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय, सांगली येथे संपन्न होणार आहे.

यावर्षीचा प्रा. रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कार दिल्ली येथे पार पडलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. प्रा. तारा भवाळकर यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल, तर कृतज्ञता पुरस्कार कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यासाठी आदरणीय डॉ. प्रा. बुधाजीराव मुळीक यांना प्रदान केला जाणार आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ९ मार्च २०२५ रोजी संपन्न होणार असून, ज्येष्ठ कवी आदरणीय रामदास फुटाणे यांच्या हस्ते आणि ह. भ. प. माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, माजी मंत्री विश्वजीत कदम, सांगलीचे खासदार विशालदादा पाटील, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल काका पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.