Home महाराष्ट्र कोंढाणे धरण घोटाळ्याप्रकरणी 7 अधिकारी निलंबित

कोंढाणे धरण घोटाळ्याप्रकरणी 7 अधिकारी निलंबित

0

नागपूर: कोंढाणे धरणाच्या घोटाळ्याप्रकरणी 7 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यापैकी तीन निवृत्त अधिकारी आहेत, तर 4 सेवेतील अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नागपुरात ही घोषणा केली.
सिंचन विभागाच्या अधिक्षक अभियंत्याचाही यात समावेश आहे. आता याप्रकरणातील राजकारण्यांवर कधी कारवाई होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळ कोंढाणे धरण प्रकल्प बांधण्यात आला आहे. प्रकल्प बांधतानाची मूळ किंमत 80 कोटी होती. त्यात वाढ होऊन ती 327 कोटीपर्यंत पोहचली. विशेष म्हणजे प्रकल्पाची किंमत कितीतरी पटीनं वाढवताना कुठल्याही विभागाची परवानगी घेतली नाही. याशिवाय प्रकल्प बांधताना नियमांची पूर्तात केली नसल्याचाही आरोप आहे.
एबीपी माझानं हे सगळं प्रकरण लावून धरलं होतं. त्यानंतर आता चार अधिकाऱ्यांना घरी बसवण्यात आलं आहे. मात्र ज्या राजकीय दबावातून हे सारं घडलं त्या राजकीय नेत्यांवर कारवाई कधी होणार हा प्रश्न विचारला जात आहे.
या अधिकाऱ्यांचं निलंबन
राजेश रिठे – अभियंता
रामचंद्र शिंदे – अधिक्षक
गिरीराज जोशी – कार्यकारी अभियंता
विजय कासट – उपविभागिय अभियंता

Exit mobile version