Home महाराष्ट्र धान उत्पादक शेतकèयांवर सरकारने केला अन्याय-खासदार पटेल

धान उत्पादक शेतकèयांवर सरकारने केला अन्याय-खासदार पटेल

0

गोंदिया-लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचे विरोधकांनी दिलेल्या आश्वासनासमोर आम्ही कुठे तरी कमी पडलो.त्यामुळे लोकांच्या अपेक्षा विरोधकांकडून वाढल्या त्यामुळेच राज्य व केंद्रात सत्ताबद्दल झाले.ज्या शेतकèयांच्या बळावर भारतीय जनता पक्षाने सत्ता हस्तगत केली.त्याच पुर्व विदर्भातील धानउत्पादक शेतकèयाच्या धानाला भाव व बोनस मिळवून देण्यात मात्र सत्ताधारी सरकार अपयशी पडले असून त्यांनी शेतकèयावर अन्याय केल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार प्रफुल पटेल यांनी केली.ते आज गोंदियाच्या दोन दिवसीय भेटीवर आले असता एमआयटीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमच्या आघाडीची जेव्हा सरकार राज्यात होती,तेव्हा आम्ही धानाला बोनस व दर वाढवून दिला होता.आमच्या सरकारच्या काळात १५६० व १५४०रुपये qक्वटल दर धानाला मिळायचा.तेव्हा भाजपसेनेचे नेते ३ हजाराची मागणी करायचे परंतु आज त्यांचीच सत्ता केंद्रात व राज्यात असताना १३६० रुपयापेक्षाही कमी दर मिळत आहे.एकीकडे संसदेत ५ हजार रुपये दराची मागणी करायची आणि दुसरीकडे कमी दरात धान विकण्यास बाध्य करायचे काम या सरकारसोबतच पूर्व विदर्भातील निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी केल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला.नागपूरच्या अधिवेशनात काँग्रेस राष्ट्रवादीने सरकारकडे पाठपुरावाही केला.परंतु सत्तेत असताना घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करायचो ते विरोधात आल्यावर हिसकावून घेण्यात थोड कमी पडल्याचे विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले.यासोबतच राज्य सरकारने गोंदिया जिल्ह्यातील ४ तालुक्यांचा समावेश नक्षलग्रस्त भागातून वगळल्याने गोंदिया तालुक्यात होणाèया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या केंद्र सरकारने दिलेल्या विशेष निधी वर परिणाम पडणार असल्याचे म्हणाले.नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आमच्या तत्कालीन सरकारने निधी दिला होता.तो निधी यानिर्णयामुळे मात्र भविष्यात मिळण्याची शक्यता कमी असल्याचे पटेल म्हणाले. साकोली तालुक्यातील भेल प्रकल्प विद्यमान केंद्र व राज्यसरकारच्या असहकार्य भूमिकेमुळे ठप्प पडला असून रोजगारांना मिळणार रोजगारही हिरावण्याची वेळ सरकारने आणल्याचे आरोप केला.आपण निवडून गेलो नसलो तरी गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहोत,निवडलेल्या लोकप्रतिनिधीने आपणास विकासाच्या बाबतीत सहकार्य मागितले तर आपण देऊ असेही पटेल म्हणाले.यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजेंद्र जैन व तुमसरचे माजी आमदार मधुकर कुकडे,देवेद्रंनाथ चौबे,राजू एन.जैन उपस्थित होते.

जबरदस्तीच्या धर्मांतरणाला आमचा विरोध
देशात सध्या ज्या पद्धतीने घर वापसीच्या नावावर धर्मांतरणाचा प्रकार सुरू आहे,त्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध असून भारतात लोकशाही पद्धतीने प्रत्येक नागरिकाला धर्म व भाषेच्या बाबतीत राज्यघटनेने अधिकार दिले आहेत.परंतु देशात जे जोरजबरदस्तीने धर्मांतरण सुरू करण्यात आले त्यावर आमचा आ़क्षेप असल्याचे प्रफुल पटेल म्हणाले.कुणी जर या देशाची राज्यघटना बदलून आपल्या पद्धतीने सरकार चालविण्याचा प्ऱयत्न करणार असेल तर ते सुध्दा शक्य नाही,असेही म्हणाले.

वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आजही राष्ट्रवादी
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाने लोकांना वेगळ्या विदर्भाचे गाजर दाखविले.त्याबळावर आज ते सत्तेत आले.परंतु त्यांच्या मनात विदर्भ करण्याची मुळीच इच्छा नाही असे म्हणत भाजप आज विदर्भ वेगळा करण्याचा निर्णय घेत असेल तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यास पूर्ण पाqठबा आहे,असे प्रफुल पटेल म्हणाले.परंतु विदर्भ वेगळा झाला तर उर्वरित महाराष्ट्रात भाजपचे आमदार संख्याबळ कमी असल्याने तिकडे शिवसेनेची किंवा काँग्रेस आघाडीची सरकार येऊ शकते ,हे राजकीय गणित बघूनच भाजप वेगळ्या विदर्भाच्या मुद्याला बगल देत असल्याचे पटेल म्हणाले.

Exit mobile version