Home महाराष्ट्र शौचालय बांधण्यासाठीच्या अनुदानात चौपट वाढ

शौचालय बांधण्यासाठीच्या अनुदानात चौपट वाढ

0

मुंबई-ग्रामीण भागात शौचालय बांधण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, शौचालय बांधण्यासाठीच्या अनुदानात चौपट वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात शौचालय बांधण्यासाठी तीन हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. ते आता १२ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली.
अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर राज्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी मूळ रकमेच्या १५ टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्याचा निर्णयही पाणीपुरवठा विभागाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!
Exit mobile version