केंंद्रिय राज्यमंत्री दानवेंचा कार्यक्रम उधळून लावायच्या तयारीत असणारे, काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात!

0
74
जालना,दि.23 : केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या आज अंबड तालुक्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंबड शहरात आठ ते दहा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्ते रावसाहेब दानवे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याच्या तयारीत होते. या सर्व काँगेस कार्यकर्त्याना एका हॉटेल मधून पोलिसानी ताब्यात घेतले आहे. तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राणा, नगरसेवक केदार कुलकर्णी, उपन्गराध्यक्ष जाकेर डावरगावकर,संभाजी गुढे, काँग्रेस सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष वैजिनाथ पाटील डोंगरे, नारायण मुंडे, मुस्ताक शहा, सलमान बागवान यांच्या सह आठ ते दहा कार्यकर्ते पोलिसाच्या ताब्यात घेतले आहे.
भाजपची जनाशीर्वाद  यात्रा जालन्यातील बदनापूरमध्ये आली असताना तिथे झालेल्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत राहुल गांधी हे काम नकरणारा बैल म्हणजे सांड असून कोणत्याच कामाचे नाहीत असं वक्तव्य केलं होतं. तसेच लोक जनावरं जशी देवाला सोडतात त्यानंतर ती जनावरं कोणत्याच कामाला चालत नाही तसे राहुल गांधी असून ते पंतप्रधान पदासाठी निष्क्रिय असल्याचं दानवे यांनी म्हटलं होत, दानवेंच्या याच वक्तव्याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते, दानवे यांचा पुतळा जाळून, व त्यांच्या पोस्टर ला जोडे मारो आंदोलन करून जाहीर निषेध ही करण्यात आला होता. दरम्यान काँग्रेसच्या वतीने दानवे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता, त्या इशारच्या पार्श्वभूमीवर आज अंबड शहरात काँग्रेस कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरवात केली आहे.