Home मराठवाडा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीचे बैठक संपन्न

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीचे बैठक संपन्न

0

औरंगाबाद दि 02 : औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सुभाष देसाई  यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या निधी बाबत आढावा घेण्यात आला.

या बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबाद विमानतळ विस्तारीकरणासाठी केंद्र स्तरावरून निधीची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.

खासदार इम्तियाज जलील यांनी समांतर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामास गती देऊन विहित कालावधीत  पाणी उपलब्ध करण्याची मागणी केली.

आमदार हरिभाऊ बागडे आणि अतुल सावे यांनी जिल्ह्यातील शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या कृषी पंपांच्या डी पीमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने डीपीसाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीला केली.

आमदार हरिभाऊ बागडे यांनी फुलंब्री तालुक्यातील पंतप्रधान आवास योजना ,रमाई घरकुल योजना, शबरी आवास योजना अंतर्गत उर्वरित लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी या  आर्थिक वर्षात करण्यात यावी अशी मागणी  केली .

आमदार श्री. बोरनारे यांनी गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील लाभापासून वंचित  राहिलेल्या शेतकऱ्यांना  पीक विमा मिळवून द्यावा, विमा कंपनीने शेतकऱ्यांची विम्याच्या फरकाची रक्कम देण्याबाबत  कारवाई करण्याची मागणी केली. वैजापूर तालुक्यातील हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या परताव्यासाठी नजीकच्या हवामान अंदाज केंद्राची माहिती आधारभूत मानून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फळपीक विमा मिळणेबाबतची मागणीही यावेळी श्री बोरणारे यांनी केली .

यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड,  खासदार इम्तियाज जलील, आमदार सर्वश्री अंबादास दानवे, हरीभाऊ बागडे, अतुल सावे, संजय शिरसाठ, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निलेश गटणे, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया,  तसेच इतर समिती सदस्य आणि सर्व शासकीय यंत्रणाचे विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते.

ठळक बाबी

जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत माहेमार्च, 2022 अखेर झालेल्या

खर्चाचा तपशील.

(रु.कोटीत)

अ. क्र. योजना अर्थसंकल्पित नियतव्यय वितरीत निधी झालेला खर्च खर्चाची टक्केवारी
1 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 365.00 365.00 365.00 100%
2 आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओ.टि.एस.पी.) 7.66 7.66 7.66 100%
3 अनुसूचित जाती उपयोजना  (एस.सी.पी.) 103.00 103.00 102.99 99.99%

 

  • जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 अंतर्गत एकूण मंजूर नियतव्यय रु.365.00 कोटी इतका होता. शासनाचे निर्देशाप्रमाणे मंजूर नियतव्ययाच्या 40% प्रमाणे एकूण रु.146.00 कोटी मर्यादेत कोविड-19 या विषाणूमुळे पसरणा-या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंध करण्यासाठी अनुज्ञेय होता.  कोविड-19 उपाययोजनांसाठी आवश्यकतेनुसार एकूण रु.62 कोटी च्या कामास मान्यता देवून रु.90.66 कोटी (एकूण नियतव्ययाच्या 24.84 %) इतका निधी यंत्रणेस उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

 

 

 

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22

कोव्हिड–19 (COVID-19) या विषाणूमुळे पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंध करणे अंमलबजावणी यंत्रणानिहाय मंजूर निधीचा तपशील

                                                                                           (रु.लाखात)

अ.क्र. अंमलबजावणी यंत्रणा प्रशासकीय मान्यता रक्कम वितरीत निधी आहरीत निधी / झालेला खर्च
1 जिल्हा शल्य चिकित्सक 3356.37 3234.88 3234.88
2 अधिष्ठाता, शासकीय वैदयकीय महाविद्यालय  व रुग्णालय. 4924.31 3855.90 3855.90
3 अधिष्ठाता, शासकीय दंत महा. व रुग्णालय. 23.23 22.96 22.96
4 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण 847.07 847.07 847.07
5 प्रपाठक, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक, पैठण 127.07 124.05 124.05
6 आयुक्त, महानगरपालिका 954.04 948.84 948.84
7 मुख्य कार्यकारी अधि., जि.प. 22.80 22.80 22.80
8 पोलीस अधिक्षक, ग्रामीण 10.00 10.00 10.00
एकूण 10261.89 9066.50 9066.50

 

सन 2021-22 मध्ये खालील प्रमुख बाबींसाठी उपलब्ध करुन दिलेला निधी व कामे संख्या –

अ. क्र. बाब उपलब्ध करुन दिलेला  निधी (रु.कोटीत) कामाचा तपशील
1 ग्रामपंचायतींना जन सुविधासाठी विशेष अनुदान 14.90 ग्रामपंचायत इमारत 21, स्मशान शेड 72, भूमीगत गटार 7 व गावातंर्गत रस्ते 142.
2 अंगणवाडी बांधकाम 10.40 अंगणवाडी  कामे- 72
3 ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण (3054) 26.91 102 रस्ते.
4 इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण (5054) 28.00 109 रस्ते
5 प्राथमिक शाळा बांधकाम 10.00 30 प्रा.शाळातील 49 वर्ग खोल्या बांधकाम
6 प्राथमिक शाळा विशेष दुरुस्ती 14.90 380 प्राथमिक शाळा दुरुस्ती
7  माध्यमिक शाळा बांधकाम व विशेष दुरुस्ती. 3.00 25 माध्यमिक शाळा बांधकाम व दुरुस्ती.

*****

 

 

Exit mobile version