पंकजा मुंडेंशी संबंधित बँकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार;गुन्हे शाखेच्या नोटीसीने खळबळ

0
12

बीड :-भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या बीडच्या वैद्यानाथ बँकेला आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. कोट्यावधींच्या गैरव्यवहाराच्या आरोपप्रकरणी ही नोटीस २४ जानेवारीला पाठवण्यात आली आहे.तसेच ३१ जानेवारीला कागदपत्रांसह हजर राहून खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.

प्रकरण काय आहे?

वैद्यानाथ बँकेकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शंभूमाहादेव कारखाना गहाण होता. कारखान्याने वेळेत कर्ज परत न केल्याने कारखाना लिलावात काढण्यात आला. मात्र, या लिलाव प्रक्रियेत अटी आणि शर्तींचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसीनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.