७ जानेवारी रोजी गडदेवदरी येथे होणार पहिली बौद्ध धम्म परिषद – भन्ते नागसेन

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रमुख पाहुणे मा. राजरत्न आंबेडकर व भिखु संघ
धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) – तालुक्यातील घाटंग्री-गडदेवदरी परिसरात असलेल्या तगरभूमी येथील बुद्ध विहारात पहिल्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन रविवारी दि.७ जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती  स्वागताध्यक्ष मा.विशाल शिंगाडे,  मुख्य मार्गदर्शक पूज्य भन्ते सुमेधजी नागसेन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.३ जानेवारी रोजी दिली.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी या धम्म परिषदेचे संयोजक माजी नायब तहसिलदार पी.एम. सोनटक्के, स्वागताध्यक्ष विशाल शिंगाडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना भन्ते सुमितजी नागसेन म्हणाले की, धाराशिव तालुक्यातील तगरभूमी बुद्ध विहार घाटंग्री-गडदेवदरी परिसरात २०२० पासून बुद्ध विहार बांधण्याचे काम सुरू करण्यात येत असून त्याचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. या धम्म परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. राजरत्न आंबेडकर हे तर भिख्खु महाविरो थेरो (काळेगाव), भिख्खु पय्यानंद थेरो (लातूर), भिख्खु नागसेन बोधी थेरो (उदगीर), भिख्खु धम्मशील थेरो (बीड), भिख्खु बोधीधम्मा थेरो (अजिंठा लेणी) व भिख्खु बुध्दशील (लातूर) हे प्रमुख धम्मदेसना देणार आहेत.
सकाळी ९.३० वाजता धम्म ध्वजारोहण, सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान पुजनीय भिख्खु संघास भोजनदान तर दुपारी १२ वाजता धम्म परिषदेचे उद्घाटन व भिख्खु संघाची धम्मदेसना होणार आहे. यासाठी लक्ष्मणराव जगताप व भारत जगताप- बोर्डेकर यांच्या स्मरणार्थ बुद्ध मूर्ती दान देण्यात आली आली असल्याचे त्यांनी नमूद केले. तर आ कैलास पाटील यांनी त्यांच्या विकास निधीतून २५ लाख रुपयांचे सभागृह बांधण्यास निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या सभागृहाचे बांधण्यात पूर्ण करण्यात आले असून तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, धम्म हॉल व भिख्खू निवासाचे उद्घाटन देखील या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे  अध्यक्ष म्हणून डॉ राजरत्न आंबेडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ कैलास पाटील, धनंजय शिंगाडे, विश्वास शिंदे, न्यास नोंदणी विभागाचे सहआयुक्त पाईकराव, अमित शिंदे, सुरज साळुंके, धीरज पाटील, संजय पाटील- दुधगावकर, महेंद्र धुरगुडे, संताजी चालुक्य, कैलास शिंदे व निमंत्रक सिद्धार्थ बनसोडे यांच्यासह राजाभाऊ ओव्हाळ, पृथ्वीराज चिलवंत, सुदेश माळाळे, पुष्पकांत माळाळे, मेसा जानराव, प्रवीण रणबागुल, शितल चव्हाण, संजय वाघमारे, अरुण बनसोडे, कमलाकर बनसोडे, विद्यानंद बनसोडे, स्वप्निल शिंगाडे, महेंद्र चंदनशिवे, रमाकांत गायकवाड, हुंकार बनसोडे, राणा बनसोडे, गडदेवदरीच्या सरपंच मोहराबाई आढाव व घाटंग्रीच्या सरपंच रणजीत शिंदे, स्वप्निल शिंगाडे, निखिल बनसोडे, राहुल सोनटक्के, रमेश कांबळे, सुनील डावखरे व आंबेवाडीकर आदी उपस्थित राहणार आहेत. ही धम्म परिषद सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत व दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अशा २ सत्रांमध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या धम्म परिषदेस जास्तीत जास्त बौद्ध बांधव व आंबेडकरी अनुयायांनी सहभागी व्हावे असे आवाहन नागसेन यांनी केले.