रोटरी क्लब उस्मानाबादच्या  वतीने उल्लेखनीय काम  करणाऱ्या व्यक्तींचा प्रमाणपत्र देऊन गौरव

0
5

धाराशिव – येथील जे.एफ.अजमेरा  रोटरी नेत्र रुग्णालय, धाराशिव येथे दिनांक १५/०२/२०२४ रोजी, रोटरी क्लब उस्मानाबादच्या  वतीने विविध  क्षेत्रातील  उत्कृष्ट , उल्लेखनीय काम  करणाऱ्या व्यक्तींना  सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन  गौरविण्यात  आले.  सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या  म्हणुन डॉ. रोहीणी  काचोळे ह्या होत्या यावेळी त्यांच्या  कार्याबद्दल  त्यांचा मानपत्र व  सन्मान चिन्ह  देऊन  सत्कार करण्यात  आला तर प्रमुख उपस्थिती डॉ. शिल्पा  दमकोंडवार अधिष्टाथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव व श्री. संजय काचोळे, हे होते.
Vocational Excellence Awards या कार्यक्रमात विविध  क्षेत्रातील  उत्कृष्ट , उल्लेखनीय काम  करणाऱ्या एकूण दहा  जणांचा गौरव करण्यात आला, यात मोनिका जयसिंग कवडे-(पोस्ट वुमन), शुभांगी विजय सरवदे (लाईन वुमेन), रेबेका आनंद भंडारे-(प्रभारी मॅट्रोन), लक्ष्मण भीमराव सिडाम-(मसाजिस्ट आयुर्वेदिक कॉलेज धाराशिव), अश्विनी अमोल जाधव-(वाहक एस टी महामंडळ), सूर्यकांत बापूराव घोडके-(चालक एस टी महामंडळ), सीमा रामराजे थोरात-(आशा कार्यकर्ती), भास्कर निवृत्ती पवार-(मुकादम सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव), सोनाली शिवाजी लांडगे-(शिक्षिका वडार वस्ती पालावरची शाळा, धाराशिव), निर्मला वासुदेव कुलकर्णी-(अंगणवाडी कार्यकर्ती) यांचा समावेश आहे.
सदरील कार्यक्रमात सत्कारार्थी व त्यांचे कुटुंबीय, रोटरी सदस्य मोठ्या  संख्येने  उपस्थित होते.  प्रास्तविक  रोटरी  क्लब  अध्यक्षा  डॉ. अनार  साळुंके  ह्यानी  केले  तर   सूत्रसंचलन व आभार  सचिव  डॉ. मीना जिंतूरकर ह्यानी मानले.