वाढदिवसानिमित्त अप्पारावपेठ केंद्रातील नऊ जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप

0
22

अप्पारावपेठ(प्रतिनिधी): जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अप्पारावपेठ चे केद्रीय मुख्याध्यापक प्रमोद रत्नाळीकर यांच्या 55 व्या
वाढदिवसानिमित्त अप्पारावपेठ केंद्रातील गोंडजेवली तांडा ,गोंडजेवली, मलकजांम, मलकजांब तांडा, पांगरपहाड बोरबन तांडा, फुलेनगर ,अप्पारावपेठ,दत्तनगर जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आला सरांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला .

सर्व शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक,शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते यावेळी गोंडजेवली तांडा येथे बाबळे उत्तम यांनी त्यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक केले.

केंद्र प्रमुख सत्यनारायण कौड म्हणाले समाजातील अंतिम घटकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून आपण समाजाच देन लागतो व सामाजिक बांधिलकी जपणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून ते सामाजिक काम करतात त्याबद्दल त्यांचा खूप अभिमान वाटतो , यावेळी केंद्रातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनीही सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक केले व त्यांना वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सदर उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.