सलग दुसऱ्या वर्षी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला ‘बालस्नेही’ पुरस्कार

0
47
परभणी, दि. 04  : राज्य शासन व राज्य बाल हक्क आयोग यांच्या वतीने बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व यंत्रणांचा सन्मान मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजित ‘बालस्नेही पुरस्कार-२०२४’ समारंभात करण्यात आला. जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाला हा बालस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आला. परभणी जिल्ह्यात एकूण 6 प्रकारामध्ये ‘बालस्नेही’ पुरस्कार प्राप्त झाला आसून, बालस्नेही पुरस्कार वितरणासाठी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, प्रशांत नारनवरे, आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती सुशिबेन शाह, सदस्या प्रज्ञा खोसरे, श्रीमती. पालवे, संजय सेंगर, श्री. पुरंदरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी म्हणून परभणी जिल्ह्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांच्यासह परीविक्षा अधिकारी मनीषा तांदळे यांना ही बाल स्नेही 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती, जीवन आशा शिशुगृह, व लक्ष्मी प्रतिष्ठान संचलित मुलांचे बालगृह/निरीक्षण गृहाचे काळजी यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.