Home मराठवाडा सेन्सेक्स ५३८ अंकाने कोसळला

सेन्सेक्स ५३८ अंकाने कोसळला

0

मुंबई- कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण, जागतिक आर्थिक आघाडीवर निराशाजनक वातावरण आणि डॉलरसमोर रुपयाचे अवमूलन यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५३८ अंकानी कोसळला. गेल्या वर्षभरात एकाच दिवसात एवढी मोठी घसरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबई शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली.

मागच्या तीन सत्रांत सेन्सेक्स तब्बल ५११ अंकांनी घसरला होता. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५३८.१२ अंकांची घसरण होऊन तो २६७८१.४४ वर बंद झाला.

या घसरणीचा राष्ट्रीय शेअर बाजारावरही परिणाम जाणवला असून, निफ्टीमध्ये १५२ अंकांची घसरण झाली. निफ्टी ८०६७.६० अंकांवर बंद झाला.

कच्चा तेलाचे घसरणारे दर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुखावणारे असले तरी, तेलाची आयात वाढवल्याने डॉलरची मागणी वाढून रुपयाचे अवमूलन होत आहे. त्याचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम होत आहे. धातू, एफएमसीजी, बँकिंग क्षेत्राच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

Exit mobile version