Home मराठवाडा कोळसा गैरव्यवहार सीबीआयकडे सोपवा

कोळसा गैरव्यवहार सीबीआयकडे सोपवा

0

चंद्रपूर : सीटीपीएसमधील कोळसा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून चौकशी करण्याची मागणी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केली आहे.

केंद्रातील कोळसा ब्लॉक वाटपातील घोटाळा उजेडात आणला. त्याचप्रमाणे भाजपा सरकारने सीटीपीएसमधील कोळसा घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

घुग्घुसच्या कोलसायडिंगवरुन कोळसा सीटीपीएसला पुरविला जातो. चांगल्या आणि खराब कोळशाची वर्गवारी करुन चांगला कोळसा सीटीपीएसला पुरविण्याचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले होते. मात्र ही कंपनी वर्गवारी न करताच दगडमिश्रीत कोळसा पुरविला जात होता. यामुळे सीटीपीएसमधील क्रेशरवर परिणाम होत असून, वीज उत्पादन प्रभावित होत आहे. त्यामुळे या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी करण्यात आली. पत्रपरिषदेला फिरोज पठाण, घनश्याम येरगुडे, राहुल दडमल, नजर खाँ पठाण, आशुतोष सातपुते, अरविंद गौतम, गीतेश शेंडे, गोलू तन्नीरवार आदी उपस्थित होते

error: Content is protected !!
Exit mobile version