Home Top News पेट्रोल 6, डिझेल 5 रुपये स्वस्ताई सरकारने रोखली

पेट्रोल 6, डिझेल 5 रुपये स्वस्ताई सरकारने रोखली

0

नवी दिल्ली – केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल, डिझेलवरील अबकारी शुल्कात लिटरमागे 2 रुपयांनी पुन्हा वाढ केली. अडीच महिन्यांतील ही तिसरी वाढ आहे. ती झाली नसती तर पेट्रोल ५.७५ रुपये, तर डिझेल ४.५० रुपये स्वस्त झाले असते. स्थानिक करांनुसार अनुक्रमे रुपयांची दरकपात झाली असती.

पेट्रोल, डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. म्हणजे पूर्णपणे बाजारावर निर्भर. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्यास देशात इंधन महाग, तर घटल्यास स्वस्त होईल, परंतु घडले उलटेच. यूपीएच्या कार्यकाळात कच्चे तेल महागत होते. त्यानुसार इंधन महागले. पण हे तेल साडेपाच वर्षांत सर्वाधिक स्वस्त झाले असतानाही सरकार लोकांना थोडाच फायदा देत आहे. अबकारी शुल्क वाढवून आपली तिजोरी भरत आहे. तीन वेळच्या शुल्कवाढीतून सरकारला १७ हजार कोटी मिळतील.

सरकारचे मिस-मॅनेजमेंट : वित्तीयतुटीचा हिशेब करताना कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरवर होते. आता ५३ डॉलरवर असल्याने आयात बिल घटले. त्यामुळे सरकारची आर्थिक स्थिती सुधरायला हवी. मात्र, उलटेच घडले. नोव्हेंबरपर्यंत तुटीचे उद्दिष्ट ९९%वर पोहोचले. जूनच्या ५.७%च्या तुलनेत विकास दर सप्टेंबरच्या तिमाहीत ५.३ %वर पोहोचला आहे. यामुळेही सरकार तूट नियंत्रणात आणू शकली नाही.

तीन वेळा शुल्कवाढ
१२ नोव्हेंबर : पेट्रोल डिझेलवर १.५ रु/लि.
2 डिसेंबर: पेट्रोल२.२५ रु. डिझेलवर रु/लि.
1 जानेवारी: पेट्रोलआणि डिझेलवर रुपये/लिटर.

ग्राहकांचा फायदा सरकारने लाटला
46.3% घटले कच्च्या तेलाचे दर मात्र, पेट्रोल स्वस्त झाले 14.23%

– १ जून २०१४ला १०७.१४डॉलर/बॅरल, म्हणजे ६,३२४.४७ रु. (तेव्हा एक डॉलरची किंमत ५९.०३ रु. होती.)
– आज५३.५३डॉलर/बॅरलआहे, म्हणजे ३,३९०.०५ रु./बॅरल. (आता एक डॉलर ६३.३३ रुपयांना आहे.)
म्हणजेचकच्चे तेल तब्बल ५४ डॉलर्सने स्वस्त झाले आहे.

– 7 जूनला पेट्रोलदर ७१.५१ रु./लि. होता.
– 1 जानेवारीला पेट्रोलआहे ६१.३३ रु./लिटर
मात्र,पेट्रोल १० रु. स्वस्त
डिझेल स्वस्त 9.1%

– १९ ऑक्टोबरला नियंत्रणमुक्त.तेव्हा किंमत ५५.६० रुपये लिटर. आता ५०.५१ रु.
डिझेलफक्त रुपये स्वस्त. २.५ महिन्यांत क्रूड ३५.३%स्वस्त

सरकारचे तीन युक्तिवाद
१. कर वाढवल्याने चालू वित्त वर्षात सुमारे १३ हजार कोटी जास्त मिळेल. त्यामुळे सरकारचे नुकसान कमी होईल. जीडीपी ४.१ % वर आणणे सरकारचे लक्ष्य आहे.

२. सरकार अनेक विकास योजनांवर काम करत आहे. यासाठी निधी हवा. तो उभारण्याची संधी असेल तर त्यात चुकीचे काही नाही.

३.करवाढीचा भविष्यात फायदा होईल. कच्चे तेल महागेल तेव्हा अबकारी कर कमी करून संतुलन साधले जाईल.

error: Content is protected !!
Exit mobile version