Home राष्ट्रीय देश भाजपाचा निवडणूक खर्च ७१४ कोटी

भाजपाचा निवडणूक खर्च ७१४ कोटी

0

नवी दिल्ली – २०१४मध्ये लोकसभा आणि काही राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत देशातील राजकीय पक्षांनी किती खर्च केला याची माहिती निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.
२०१४च्या लोकसभा आणि आंध्रपद्रेश, ओदिशा आणि सिक्कीम राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ७१४ कोटी रुपये खर्च केले तर काँग्रेसने ५१६ कोटी रुपये खर्च केले. भाजप, काँग्रेससोबत या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ५१ कोटी तर बसपाने तीस कोटीहून अधिक खर्च केला. तर कम्युनिस्ट पक्षाने १८ कोटीहून अधिक खर्च केला.
नोव्हेंबरमध्ये निवडणूक आयोगाने या पक्षांना खर्चाची माहिती देण्यासंबंधित कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. भाजपाने १२ जानेवारी रोजी ही माहिती सादर केली तर काँग्रेसने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निवडणूक आयोगाकडे ही माहिती पाठवली.
नियमानुसार विधानसभा निवडणुकीसाठी ७५ दिवसांच्या आत आणि लोकसभा निवडणुकीसाठी ९० दिवसांच्या आत संबंधित पक्षाने निवडणूक खर्चाची माहिती सादर करणे गरजेचे असते.

error: Content is protected !!
Exit mobile version