किरण बेदींच्या ‘भपकेबाजी’वर भाजप नेते नाराज

0
15
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली – देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी शुक्रवारी दिल्लीतील भाजप कार्यालयात गेल्या होत्या. त्यांचे स्वागत देखील झाले, मात्र दिल्ली भाजपमधील एक मोठा गट हा बेदी यांचे नेतृत्व वरुन थोपवले गेल्यामुळे नाराज आहे. सूत्रांची माहिती आहे, की राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी किरण बेदी यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराप्रमाणे प्रोजेक्ट केल्यावरुन नापसंती व्यक्त केली आहे.

पहिल्या भाषणातच कार्यकर्त्यांना फटकारले
भाजप कार्यालयात आलेल्या किरण बेदींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आपसांत चर्चा करणार्‍या कार्यकर्त्यांना शांत राहाण्यासाठी त्यांनी फटकारले. यामुळे नाराज झालेले कार्यकर्ते म्हणाले, किरण बेदी पक्षात सहभागी झाल्या आहेत. आपण त्यांना साथ दिली पाहिजे. मात्र, हे देखील खरे आहे की त्यांना राजकारणाचा अनुभव नाही.

येथे दिलेल्या भाषणात बेदी म्हणाल्या, कार्यकर्त्यांनी 10 मिनीटे शांत बसून मी काय बोलते ते गांभीर्याने ऐकावे. कारण हा काही मनोरंजनाचा खेळ नाही. त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनेही विकासाबाबत मी दिलेला सल्ला स्विकारला आहे. स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराप्रमाणे सादर करुन बेदी म्हणाल्या, दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री सकाळी नऊ वाजता कोणत्याही मतदारसंघाचा किंवा भागाचा दौरा करु शकतात. त्यावेळी त्यांच्यासोबत सर्व अधिकारी देखील राहातील.

पक्षातील एका गटाने किरण बेदी आणि शाजिया इल्मी यांना अजूनही मनापासून स्विकारलले नाही. ते त्यांना अजूनही बाहेरचेच मानतात. मात्र, त्याचवेळी पक्षाचे दिल्ली अध्यक्ष सतीश उपाध्याय या दोन्ही महिलांचे समर्थन करत आहेत.