दहशतवादी हल्ल्यात पोलीस शहीद

0
18
वाढदिवसाच्या शुभेच्छा

श्रीनगर – आज सकाळी दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला असून एक नागरिक जखमी झाला आहे.

शनिवारी सकाळी होमशालीबागचे नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार अब्दुल माजीद लारमी यांचे वैयक्तीक सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असणारे झहूर अहमद दार हे रेडवानी येथील आपल्या घरातून मोटरसायकलवरुन कामाला निघाले असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात झहूर अहमद दार यांचा जागीच मृत्यू झाला. तर झहूर अहमद इलाही हे जखमी झाले आहेत.