अधिवेशनासाठी कार्यालय व निवास व्यवस्था सज्ज ठेवा : अनूप कुमार

0
15

नागपूर : विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी विधानमंडळ सचिवालयासह हैद्राबाद हाऊस तसेच मंत्रिमहोदय व वरिष्ठ अधिकार्यांचे कार्यालय व निवास व्यवस्था सज्ज ठेवा, अशा सूचना विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिल्यात. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विधिमंडळ अधिवेशनासंबंधी करावयाच्या विविध विभागांच्या कार्यालय तसेच निवास व्यवस्थेसंदर्भात विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी वरिष्ठ अधिकाºयांच्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजीराव जोंधळे, महसूल विभागाचे उपायुक्त एम. ए. एच. खान, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त आप्पासाहेब धुळाज, महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त हेमंत पवार, माहिती संचालक मोहन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अजित सगणे, कार्यकारी अभियंता पी. डी. नवघरे, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, स्वागताधिकारी प्रकाश पाटील तसेच विविध विभागांचे जिल्हा प्रमुख उपस्थित होते. विधिमंडळ अधिवेशनासाठी निवास व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन देतांना अतिरिक्त खर्च टाळण्याच्या सूचना करतांना विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की, रविभवन, नागभवन आदी शासकीय निवासस्थानाच्या परिसरात विधिमंडळासाठी आवश्यक सुविधांचा नियमित आढावा घेण्यात येईल. तसेच अधिवेशनापूर्वी किमान आठ दिवस संपूर्ण व्यवस्था सज्ज असेल यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने कामांचे नियोजन करावे. या परिसरात स्वच्छता ठेवण्यासोबतच वाहतूक व्यवस्था निश्चित करावी, असेही त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी रविभवन येथे निवास व्यवस्था असून वरिष्ठ अधिकाºयांसाठी शहरातील शासकीय तसेच निमशासकी य विभागांच्या विश्रामगृहामध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. या सर्व विश्रामगृहात असलेल्या आवश्यक सुविधांची माहिती यावेळी देण्यात आली. सचिव तथा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाºयांच्या निवास व्यवस्थेसाठी आढावा यावेळी घेण्यात आला. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आमदार निवास ते विधानमंडळ सचिवालय येथे एस. टी. महामंडळातर्फे वाहतूक व्यवस्था, महानगरपालिकेतर्फे या परिसराची नियमित स्वच्छता, अग्मिशमन व्यवस्था, विद्युत व्यवस्था. तसेच माहिती व जनसंपर्क विभागातर्फे तयार करण्यात येणाºया दूरध्वनी पुस्तिकेच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला.