पंकजा मुंडे म्हणाल्या – हॅट्स ऑफ शरद पवार साहेब

रोहित पवार कौतुक करत म्हणाले - 'आपल्याकडून इतरांनी मनाचा मोठेपणा जरूर शिकावा'

0
466

मुंबईृ —राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून सतत दौऱ्यांवर आहेत. तसेच त्यांच्या अनेक बैठकाही घेणे सुरूच आहे. मंगळवारीही राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांविषयी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. दरम्यान यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांना सॅल्यूट केला आहे. यानंतर आमदार रोहित पवारांनी पंकजा मुंडेंचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

पंकजा मुंडे यांनी शरद पवारांना सलाम करत ट्विट केले की, ‘हॅट्स ऑफ शरद पवार साहेब…कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे’ असे म्हणत पंकजा मुंडेंनी शरद पवारांना सलाम ठोकला आहे.

यानंतर रोहित पवारांनी पंकजा मुंडेंना रिट्विट करत त्यांचे कौतुक करत आभार मानले आहे. रोहित पवार म्हणाले की, ‘धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा. ‘Rohit Pawar @RRPSpeaks

Quote Tweet
@PawarSpeaks hats off … कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले … पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे