जनतेला दु:खी होऊ देणार नाही :खा. प्रफुल्ल पटेल

0
166

आमगाव,दि.07ःशेतकरी व जनसामान्यांचे माझे कौटुंबिक नाते आहे, त्यांच्या आनंदात माझा आनंद आहे म्हणून त्यांना कधी दु:खी होऊ देणार नाही असे प्रतिपादन राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी केले.
तालुक्यातील कालीमाटी येथे आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव विजय शिवनकर, राजेश भक्तवर्ती, जियालाल पंधरे, सुखराम फुंडे, कविता रहांगडाले उपस्थित होते. पुढे पटेल म्हणाले, गोंदिया, भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द आहे. शेतकरी हिताकरिता राष्ट्रवादी पक्ष नेहमी अग्रेसर राहला आहे. धान उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम होईल यासाठी मागील वर्षी प्रमाणे यंदाही धानाला ७00 रुपये बोनस मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी जिप, पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता कार्यकत्र्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहनही पटेल यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना सुरेश हर्षे यांनी केली. संचालन तालुका अध्यक्ष कमलबापू बहेकार यांनी केले तर आभार संगीता दोनोडे यांनी केले. याप्रसंगी अंजली बिसेन, टिकाराम मेंढे, कविता रहांगडाले, उषा हर्षे, सुखराम फुंडे, प्रमोद शिवणकर, बाबुलाल दोनोडे, तुंडीलाल कटरे, मुक्तानंद पटले, पियुश झा, बाबुलाल दोनोडे, रमन राणे, जयश्री पुंडकर, संजय डोये, चुन्नीलाल सहारे, मोतीराम देशमुख, लखन चुटे, बबलु बिसेन, नामदेव दोनोडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते