भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी फनिंद्र पटले

0
210

गोंदिया : भारतीय जनता पार्टी गोंदिया युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी फनिंद्र (बालू) पटले यांची निवड करण्यात आली. आपल्या निवडीचे श्रेय प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पटले, जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे, दिलीप चौधरी, विश्वजीत डोंगरे, डॉ.लक्ष्मण भगत, साहेबलाल कटरे, सिताबाई रहांगडाले, चित्रलेखा चौधरी यांना दिले.
फनिंद्र पटले यांची भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ.दिलीप चौधरी, यादव बोपचे, राजकुमार पटले, महेंद्र बिसेन तसेच गोरेगाव तालुक्यातील त्यांच्या असंख्य हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.