काॅंग्रेस नेत्याने काँग्रेसच्याच मंत्र्यावर केला गंभीर आरोप

0
135

नागपूर | महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व सुरळीत सुरू आहे असं वाटायला लागलं की लगेचं काही तरी खळबळ चालू होते. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आधीच सर्वत्र गदारोळ माजला असताना आता 150 कोटींच्या भ्रष्टाचाराचा काॅंग्रेस नेत्यावर आरोप झाला आहे. या आरोपांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे.

काँग्रेसचे नेते व माजी आमदार आशिष देशमुख यांनी आपल्याचं पक्षाचे नेते राज्याचे क्रिडामंत्री सुनिल केदार यांच्यावर हे आरोप केले आहेत. सुनिल केदार हे खूप मोठे भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी नागपुर सहकारी बॅंक लुटली आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहीजे. यासाठी आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

2002 मध्ये सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष या पदावर होते. त्यांनी बँकेचे 150 कोटी रुपये खासगी दलालांमार्फत सरकारी रोख्यांमध्ये गुंतवली आणि पूर्ण रक्कम गमवावी लागली. या दलाल कंपन्यांना सुनील केदार यांनी आपल्या स्वार्थासाठी ही रक्कम सरकारी रोखे विकत घेण्यासाठी परस्पर दिली होती. या दलालांनी त्या संपूर्ण रक्कमेचा अपहार करून बँकेला या पैशांचा हिशोब दिला नाही. व नागपूर जिल्हा बँकेचे 150 कोटीचं नुकसान झालं, असा आरोप देशमुख यांनी केला.

केदार यांनी फक्त नागपूर बॅंकचं नाही तर वर्धा बॅंकेचे 30 कोटी व उस्मानाबाद बॅंकेचे 30 कोटी असे एकुण 210 कोटी बुडवले आहेत. हा असला घोटाळेबाज माणूस महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातुन काढून टाका असंही देशमुख म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून बडतर्क करण्याची मागणी केली आहे. या पत्रामुळे काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.