Home राजकीय केंद्रीय मंत्री राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

केंद्रीय मंत्री राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

0

– उपविभागीय अधिकारी मार्फत राज्यपालांना निवेदन

गोंदिया, 27 ऑगस्ट— केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करून सुडाचे राजकारण करत अटक करण्यात आली. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार करणारे, खंडणीखोर मोकाट वावरतात मात्र मंत्री राणे यांना अटक करण्यासाठी महाराष्ट्रातील पोलिस यंत्रणेला कामाला लावले जाते, ही अंत्यत दुर्दैवी बाब असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपने बुधवार 25 ऑगस्ट रोजी निषेध व्यक्त करून या संदर्भात उपविभागीय अधिकारी वंदना सवरंपते यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी केंद्रीय मंत्री यांना अटक करणे घटनात्मक मुल्यांचे उल्लंघन आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हत्या, बलात्कार असे भयंकर गुन्हे असणाऱ्या आरोपींना राज्य सरकार अटक करत नाही, मात्र एका वाक्यावरून केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक केवळ राजकीय सूडापोटीच होत आहे. हे कृत्य हुकूमशाहीला प्रेरक तर लोकशाहीचे अपमान करणारे असल्याने भारतीय जनता पक्षातर्फे निषेध करण्यात आला. या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देते वेळी जिल्हा महामंत्री संजय कुुळकर्णी, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, नप सभापती राजकुमार कुथे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक कदम, किसान मोर्चा अध्यक्ष संजय टेंभरे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, मनोज मेंढे, देवचंद नागपूरे, शंभुशरन ठाकूर, संजय मुरकूटे, अशोक जयसिंघानी, मनोज पटनाईक, पारस पुराहित, गोल्डी गावंडे, अर्जुन नागपूरे, राजेश बिसेन, रवि रामटेककर, सत्यम बहेकार, मनिष पोपट, बबली ठाकूर, सुधिर ब्राम्हणकर, बंटी शर्मा, पुरूषोत्तम ठाकरे,प्रशांत कोरे, पंकज भिवगडे, मारगाये, जसपालसिंग चावला, शंकर मस्के आदिंसह भाजपचे ग्रामीण व शहर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version