Home राजकीय अमरावती जिल्हा बँक निवडणुकीसाठी 105 उमेदवार

अमरावती जिल्हा बँक निवडणुकीसाठी 105 उमेदवार

0

अमरावती-अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आता 105 उमेदवार मैदानात आहे. नामांकन अर्जाची छाननी झाल्यावर तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचा समावेश आहे. नामांकन अर्ज परत घेण्याची मुदत 22 सप्टेंबरपर्यंत आहे, त्यानंतर किती उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात राहतात हे समोर येणार आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात प्राप्त झालेल्या 183 नामांकन अर्जाची छाननी झाली. त्यापैकी 105 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यात अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून आमदार राजकुमार पटेल, महिला मतदारसंघातून जयश्री देशमुख, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून अर्ज दाखल करणारे हरीभाऊ पळसकर यांच्या नामांकन अर्जाचा समावेश आहे. आता सेवा सहकारी सोसायटी अमरावती मतदार संघातून 6, सेवा सहकारी सोसायटी भातकुली मतदार संघातून 5, सेवा सहकारी सोसायटी अचलपूर मतदार संघातून 4, सेवा सहकारी सोसायटी चांदूर बाजार मतदार संघातून 4, सेवा सहकारी सोसायटी धारणी मतदार संघातून 4, सेवा सहकारी सोसायटी चांदूर रेल्वे 2, सेवा सहकारी सोसायटी धामणगांव रेल्वे 2, सेवा सहकारी सोसायटी तिवसा मतदार संघातून 5, सेवा सहकारी सोसायटी दर्यापूर मतदार संघातून 4, सेवा सहकारी सोसायटी अंजनगांव सुर्जी मतदार संघातून 5, सेवा सहकारी सोसायटी नांदगांव खंडेश्वर मतदार संघातून 5, सेवा सहकारी सोसायटी चिखलदरा मतदार संघातून 2, सेवा सहकारी सोसायटी मोर्शी मतदार संघातून 6, सेवा सहकारी सोसायटी वरुड मतदार संघातून 1, अनुसूचित जाती/जमाती मतदार संघातून 8, इतर मागास वर्ग मतदार संघातून 7, विजा/भज/विमाप्र मतदार संघातून 6, महिला मतदार संघातून 13, क-1 मतदार संघातून 12, क-2 मतदार संघातून 5 उमेदवारांचे नामांकन अर्जाचा समावेश आहे. सदर निडणुकीसाठी यापूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू, अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, दर्यापूरचे आ. बळवंत वानखडे, जि. प. अध्यक्ष बबलू देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष संजय खोडके, भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, माजी आ. विरेंद्र जगताप, माजी जि.प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे, कांचनमाला गांवडे, दयाराम काळे यांच्यासह अन्य दिग्गज या निवडणुकीत उतरले आहे. 8 सप्टेंबरला उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली. उमेदवारांना नामनिर्देशन मागे घेण्याची मुदत 22 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. उमेदवारांना बोधचिन्हाचे वाटप व अंतिम उमेदवार यादी 23 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. मतदान 4 ऑक्टोबरला व मतमोजणी 5 ऑक्टोबरला होईल.

Exit mobile version