Home राजकीय महाराष्ट्र व बिहारमध्ये काँग्रेस, बंगालमध्ये तृणमूल, तर बिहारमध्ये राजदचा मोठा विजय; भाजपला...

महाराष्ट्र व बिहारमध्ये काँग्रेस, बंगालमध्ये तृणमूल, तर बिहारमध्ये राजदचा मोठा विजय; भाजपला मिळाला भोपळा

0

महाराष्ट्रासह 4 राज्यांतील लोकसभेच्या 1 व विधानसभेच्या 4 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा व बीलागंज विधानसभा मतदार संघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा मोठा विजय झाला. याठिकाणी तृणमूलचे शत्रुघ्न सिन्हा व बाबुल सुप्रियो विजयी झालेत. तर महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सत्यजित कदम यांचा जवळपास 19 हजार मतांनी दारुण पराभव केला आहे. दुसरीकडे, बिहारच्या बोचहा मतदार संघात राजदच्या अमर पासवान यांनी भाजपला धोबीपछाड दिला आहे. तर छत्तीसगडच्या खैरागढ विधानसभा मतदार संघातही काँग्रेसच्या यशोदा वर्मा यांचा तब्बल 20 हजार मतांनी विजय झाला आहे.

1) बंगालमध्ये तृणमूलचा बंपर विजय

आसनसोल लोकसभा मतदार संघात शत्रुघ्न सिन्हा यांचा विजय झाला. त्यांनी भाजपच्या अग्निमित्रा पॉल यांचा 2 लाख 64 हजार 913 मतांनी पराभव केला. ही जागा गतवर्षी बाबुल सुप्रियो यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली होती. सुप्रियो भाजपला सोडचिठ्ठी देऊन तृणमूलमध्ये प्रवेश केला होता.

बालीगंज विधानसभा मतदार संघात बाबुल सुप्रियो यांनी भाजपच्या केया घोष व माकपच्या सायरा शाह यांचा पराभव केला. ही जागा माजी आमदार व राज्याचे मंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती.

बालीगंज विधानसभा मतदार संघाची जागा दिवंगत मंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती.
बालीगंज विधानसभा मतदार संघाची जागा दिवंगत मंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती.

2) महाराष्ट्रात काँग्रेसचा विजय

महाराष्ट्राच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा विजय झाला आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांना जवळपास 19 हजार मतांनी धूळ चारली. ही जागा चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झाली होती. यामुळे येथे पोटनिवडणूक झाली होती. या जागेवर 15 उमेदवार आपले नशिब आजमावत होते.

3) बिहारमध्ये राजदची सरशी

बिहारच्या बोचहां विधानसभा मतदार संघात राजदचे अमर पासवन विजयी झाले. त्यांनी भाजपच्या बेबी कुमारी यांचा 36,653 मतांनी पराभव केला. ही जागा मुसाफिर पासवान यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. या जागेवर 13 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात 3 महिला उमेदवार होत्या.

बिहारच्या बोचहांमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर आनंद साजरा करताना राजदचे कार्यकर्ते.

4) छत्तीसगडच्या खैरागडमध्ये काँग्रेस आघाडीवर

छत्तीसगडच्या खैरागड विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या यशोदा वर्मा यांनी 18 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. ही जागा जनता काँग्रेसचे आमदार देवव्रत सिंह यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. या जागेवर 10 उमेदवार रिंगणात होते.

Exit mobile version