मनसेचा पदाधिकारी मेळावा व भव्य पक्ष प्रवेश सोहळा

0
35

गोंदिया,दि.२५ ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शहरातील हाँटेल ग्रॅन्ड सिता येथे आयोजित मेळाव्यात शहरातील युवकासंह अनेकांनी पक्ष प्रवेश केला.मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी,गोंदिया जिल्हा संपर्क अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहारतील युवा वर्ग, आटो रिक्षा चालक, महिला वर्ग तसेच सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला‌. प्रवेश करणाऱ्यांमध्ये राहुल श्रीवास, गोकुल मेश्राम, सौरभ बिरिया, संस्कार लदरे,राम चाचरे,विजय बिसेन, सोनू बावनथडे,बबन बडोले, मनोज मेश्राम, कमल डवल, निखिल ठवरे, महिला मध्ये श्रीमती सुनिता ठाकूर, कल्पना चौव्हान, रूपाली भेलावे, रेखा साठवणे व इतर कार्यकर्तांचा समावेश होता. तसेच  राहुल श्रीवास यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी ( गोंदिया-अर्जुनी मोरगांव विधानसभा) व पवन सोनवाने प्रभारी जिल्हाध्यक्ष (तिरोडा-गोरेगांव) पदी नियुक्ती करण्यात आले. या प्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, जिल्हाध्यक्ष हेमंत लिल्हारे, माजी जिल्हाध्यक्ष रितेश गर्ग, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना गवली, लेखुभाऊ रहांगडाले, तसेच गोंदिया तालुका अध्यक्ष रजत बागडे, शहर अध्यक्ष राजेश नागोसे, शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, मनविसे शहर उपाध्यक्ष निखील गडपायले, शहर प्रसिद्धी प्रमुख कृष्णा ढोंगे तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते..