दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वपक्षीय 246 आमदारांचे मतदान; काँग्रेसच्या सर्व आमदारांनी बजावला हक्क

0
31

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेचा निकाल काय येतो याची आतुरता सर्वाना लागली आहे. सकाळी 9 वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार असून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपने देखील या निवडणुकीतही चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

 • मावळा गेला तरी चालेल आपला कावळा टिकला पाहिजे – अनिल बोंडे
 • काँग्रेसच्या सर्व आमदारांचे मतदान पूर्ण
 • दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वपक्षीय 246 आमदारांचे मतदान
 • आज कुणीही पावसात भिजलं तरीही त्याचा काही परिणाम होणार नाही – गोपीचंद पडळकर
 • सर्व आमदार एकमताने भाजपसोबत : राहुल नार्वेकर
 • मुख्यमंत्र्याकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न; रवी राणांचा आरोप
 • हनुमान चालीसा घेऊन रवी राणा विधानभवनात
 • शंभर टक्के शिवसेनेचा उमेदवार पडणार आहे – रवी राणा
 • वंचित विकास आघाडीचे हिंतेद्र ठाकूर मतदानासाठी विधान भवनात आले
 • राष्ट्रवादीचे दोन आमदार विधानभवनात आले नाही
 • भाजपच्या 81 तर काँग्रेसच्या 35 आमदारांनी केले मतदान; राष्ट्रवादीचे 5 महत्वाचे मतदान बाकी
 • देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या 104 आमदारांचे मतदान पूर्ण
 • काँग्रेसच्या 20 आमदारांनी केले विधान परिषदेसाठी मतदान
 • अलिबागचे आमदार महेंद्र दळवींनी केले शिवेसेनेकडून पहिले मतदान
 • शिवेसेनेच्या आमदारांचे मतदानाला सुरुवात
 • आजारी आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी विधान भवनात
 • मतदानाच्या अधिकारासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची सुप्रीम कोर्टात धाव
 • आतापर्यंत 156 आमदारांचे मतदान पूर्ण
 • भाजपच्या 81 तर राष्ट्रवादीच्या 45 आमदारांनी बजावला मतदानाचा अधिकार
 • आतापर्यंत 100 आमदारांचे मतदान पूर्ण; भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदारांनी बजावला मतदानाचा अधिकार
 • राष्ट्रवादीच्या 45 आमदारांनी केले मतदान
 • शिवसेनेची बस विधानभवनात दाखल
 • आतापर्यंत 68 आमदारांचे मतदान झाले आहे.
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल
 • भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील- राम कदम आदित्य ठाकरेंसह सेना आमदारांची बस ट्रॅफिकमध्ये अडकली
 • भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले पहिले मतदान
 • सायंकाळी आमचे सगळेच उमेदवार जिंकतील -भाई जगताप, काँग्रेस
 • शिवसेनेच्या आमदाराची बस विधानभवनाकडे रवाना
 • राज्यसभेत आमच्याकडून झालेली चूक यावेळी हिशोब चुकता करणार -भास्कर जाधव
 • महाविकास आघाडीकडे संपूर्ण संख्याबळ, भाजपचा गर्व खाली होण्याचा आजचा दिवस -नाना पटोले
 • आमचे सहा उमेदवार निवडून येतील -आमशा पाडवी

काँग्रेस-भाजपात लढत

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भाजपने याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती आखली आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेची खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच असल्याचे दिसून येत आहे.

भाजपकडे मतं नाहीत

भाजपचे 4 उमेदवार कटाकटीने निवडूण येतील. मात्र, पाचव्या जागेसाठी भाजपचे एकही मत शिल्लक नसताना भाजप हा चमत्कार कसा घडवून आणणार? हे पाहावे लागणार आहे. कॉंग्रेसच्या भाई जगताप यांच्याविरुद्ध भाजपने प्रसाद लाड यांनी उमेदवारी दिली आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून 29 आमदार आहे. या सर्वांनी मतदान भाजपला केले तर निवडणूक भाजपसाठी सोपी होईल. मविआच्या संपर्कात सुद्धा यातले काही आमदार आहेत.

मविआची प्रतिष्ठा पणाला

भाजपचे 5 आणि महाविकास आघाडीचे 6 असे 11 उमेदवार रिंगणात असून सत्ताधारी आघाडीची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली आहे. राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर होणाऱ्या या निवडणुकीत आघाडीला पुन्हा अपयश आल्यास तीन पक्षांच्या बनलेल्या राज्य सरकारच्या स्थैर्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. शिवसेनेकडे अतिरिक्त 10 मते आहेत. ती आपल्या दुसऱ्या उमेदवारास मिळावीत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

मविआकडे 170 संख्याबळ

आघाडीच्या संयुक्त रणनीतीवर विचार करण्यासाठी रात्री निवडक नेत्यांची ट्रायडंटमध्ये बैठक झाली. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. आघाडीकडे 170 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सहा उमेदवारांपैकी प्रत्येकास 28 मतांचा कोटा निश्चित करण्यात आल्याचे समजते. भाजपनेही कोटा ठरवल्याचे समजते.

एकूण आमदार 285, मतांचा कोटा : 26

10 जागांसाठी 11 उमेदवार
इतर : 29 मते = अपक्ष 13, छोटे पक्ष 16

अपात्र : 3 मते = 1 निधन, 2 आमदार तुरुंगात

शिवसेना 55 मते : 7 अपक्षांचा पाठिंबा : 2 जागा, 10 मते जास्त

राष्ट्रवादी 51 मते : 2 जागा, 3 मतांची गरज

काँग्रेस 44 मते : 2 जागा, 8 मतांची गरज

भाजप 106 मते : 5 जागा, 29 मतांची गरज