
मोहाडी : कार्यकर्त्यांनि ग्रामपंचायत च्या निवडणुकीला सामोरे जाऊन निवडणुकीत यश संपादन करावे. राष्ट्रवादी पक्ष नेहमी जनतेच्या विकासासाठी काम करणारा पक्ष आहे. आपल्या भागाचा सर्वांगीण विकासासाठी प्रफुलभाई पटेल साहेब यांनी विविध विकासकामे केली आहे. प्रत्येक गावांत आपल्या पक्षातर्फे विविध विकासकामे झाली आहेत. जनतेच्या विविध प्रश्नाला वाचा फोडून न्याय देण्याचे काम राष्ट्रवादी पक्षाने केले आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न अशोत किव्हा युवकांचे प्रश्न अशोत असे अनेक प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम आपल्या पक्षातर्फे करण्यात आले.असे प्रतिपादन आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी आढावा सभेत कार्यकर्त्यांना मार्गदशन केले.मोहाडी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे तालुक्यातील निवडणूक होत असलेल्या 58 ग्रामपंचायतिचा आढावा जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुधे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
याप्रसंगी माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे,जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव बांते,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायधणे,जिल्हामहा सचिव,मोहाडी तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, महिला अध्यक्ष रिताताई हलमारे,सभापती रितेश वासनिक,जिल्हापरिषद सदस्य महादेव पाचघरे, आनंद मलेवार, नरेश ईश्वरकर,माजी सदस्य अनिल काळे, आणि प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते, उपस्थित हॉते.
तालुक्यातील जिल्हापरिषद क्षेत्र आंधळगाव, कांद्री, डोंगरगाव, वरठी, पाचगाव, बेटाळा, करडी या क्षेत्रात 75 पैकी 58 ग्रामपंचायत च्या निवडणूक भविष्यात होणार असून पक्ष समर्पित पॅनलचा आढावा घेण्यात आला. तसेंच बूथ आढावा, शिबीर आढावा घेण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे, तुमसर नवनियुक्त तालुका अध्यक्ष धनेंद्र तूरकर यांचा सत्कार मोहाडी तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुधे व तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे यांही शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.यावेळी देऊळगाव, सालेबर्डी व अनेक गावातील कार्यकर्त्यांनि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्ष प्रवेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे यांही केले तर आभार सुभाष गायधणे यांनी व्यक्त केले.