कार्यकर्त्यांनी गावाच्या विकासाला प्राधान्य द्यावे – खासदार प्रफुल पटेल

0
12

गोरेगाव तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार

गोरेगाव,दि.31ः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा नवनिर्वाचित सरपंच तथा सदस्यांचा सत्कार सोहळा गोरेगांव येथे थाटात पार पडला. या प्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांनी परस्पर मतभेद विसरून कार्यकर्त्यांनी गाव विकासाच्या कामाला लागावे व गावाच्या विकासाला प्राधान्य द्यावे अशा सूचना केल्या.
या प्रसंगी खासदार प्रफुल पटेल पुढे म्हणाले, गावच्या निवडणुका संपल्या, निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था पुरत्या मर्यादित होत्या, पण आता सर्वांनी फक्त एकच विचार करायचं की गावाचा विकास कसा होईल. सर्व मतभेद विसरून गावाचा विकास करणे हाच मुख्य ध्येय असायला पाहिजे आणि त्या साठी प्रत्येकांनी कामाला लागले पाहिजे, अशा कर्णमंत्र कार्यकर्त्यांना दिला. खासदार प्रफुल पटेल यांनी निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे अभिनंदन करून गोरेगाव तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात प्रामुख्याने खासदार प्रफुल पटेल सह सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौंबे, राजलक्ष्मी तुरकर, रविकांत बोपचे, केवलभाऊ बघेले, विशाल शेंडे, श्रीप्रकाश राहंगडाले, कृष्णकुमार बिसेन, महेंद्र चौधरी, बाबा बहेकार, सोमेश राहंगडाले, चोकलाल येळे, गिरिधारी कटरे, भास्कर कोठेवार, महादेव राणे, भूमेश गौतम, लोकचंद वाढई, कल्पनाताई बहेकार, ललिताताई फुंडे, श्रद्धाताई रहांगडाले, कल्पनाताई शेवटे, रामटेके ताई, सुनीता जैन, सुनील कापसे, राजकुमार बोपचे, खुशाल वैध, गोरेलाल पुसाम, कैलास डोंगरे, भोजराज चौहान, शालिकराम बारेवार, कमलेश बारेवार, घनेश्वेर तिरले, श्रद्धाताई रहांगडाले, सुषमाताई बोपचे, अगडे ताई, बोरकर ताई, रामेश्वरी रहांगडाले, चौधरी ताई, धुर्पाताताई कटरे, महादेव राणे, कन्यालाल कोल्हे, प्रतीक पारधी, डॉ. ओमेश ठाकरे, डॉ उमराव रहांगडाले, महेश कटरे, गेंदलाल गौतम, धनराज तईकर, बंडू पटले, भूषण जैतवार, शिवचरण कटरे, ज्ञानेश्वर शहारे, ज्ञानेश्वर कटरे, छत्रपती भावे, नितेश येल्ले, सचिन सोनवाणे, अज्जू कुरेशी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.