शिवसेनेच्या संत परंपरेचे हिंदुत्व रुजू नये यासाठी भाजपाने घेतली फारकत-प्रकाश आंबेडकर

0
19

नाशिक-भाजपचे हिंदुत्व हे मनुवादी वैदीक पध्दतीचे आहे. तर शिवसेनेचे हिंदुत्व हे संत परंपरेचे आहे. शिवसेनेचे हे हिंदुत्व रूजू नये म्हणूनच भाजपने सेनेसाेबत फारकत घेतल्याचा आराेप वंचित बहुजन आघाहीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी नाशिकमध्ये केला. त्याचबराेबर शिवसेनेशी आमचं नातं अजून जुळलेले नाही, फक्त एकमेकांवर लाइन मारण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूकीच्या निमित्ताने शनिवारी (दि.20) आंबेडकर नाशिक दाैऱ्यावर आले हाेते. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बाेलताना त्यांनी पंतप्रधान माेदींवर टीका केली. आजकाल पक्ष बाजुला ठेवून व्यक्तिगत राजकारण सुरू आहे. याला आळा बसणे आवश्यक आहे. पंतप्रधान माेंदींच्या माध्यमातून देशात हुकुमशाहीला सुरूवात झाली असून आता लाेकांनीच ठरवायचे त्यांना हुकुमशाही स्विकारायची की लाेकशाही.

नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी मेट्रोचे उद्घाटन दोन वेळा करणे म्हणजे त्यांची खुर्ची ग्रामपालिका पातळीवर आणण्याचा प्रकार असल्याची टीका आंबेडकर यांनी केली. महापालिकेच्या प्रचाराला आलेल्या पंतप्रधानांनी आपली गरिमा राखून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातच प्रचाराला यावे असे आपणास वाटते. मात्र प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असते अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

धनशक्तीच्या विराेधात आमची लढाई

आमची नेहमी धनशक्तीच्या विराेधात लढाई असते. त्यामुळे कधी यश तर कधी अपयश येते. मात्र विधान परिषदेच्या लातूर,अकोला आणि नागपूर येथेही आमच्या उमेदवारांना पोषक वातावरण आहे. कोकणात आम्ही चांगली लढत देणार आहोत. नाशिक पदवीधर मतदार संघात आम्ही तालुकानिहाय अहवाल मागवला असता आम्हाला सर्वत्र चांगले वातावर दिसते.

घराणेशाहीला मतदार नाकारती

आमच्या उमेदवाराने गेल्या सहा महिन्यांपासून नाशिक विभागात मतदार नोंदणीचा व प्रचाराचा धडाका लावला आहे. हा मतदारसंघ मोठा असला तरी येथे मोठ्या प्रमाणात नकारात्मकता दिसते. जो उमेदवार निवडून येईल तो कमिटेड मतांच्या जोरावरच असे सांगून आम्ही या मतदारसंघात शर्यतीत आहोत. आमच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे तालुकास्तरापर्यंत कार्यकर्ते पोहोचले आहेत. कार्यकर्त्यांच्या जोरावरच आम्हाला या मतदारसंघात चांगले चित्र बघायला मिळत आहे.

मुख्यमंत्री जेव्हा जेव्हा बाेलावतील तेव्हा तेव्हा भेटणार

एकीकडे तुमची शिवसेनेबरोबर युतीची चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटता यामागचे रहस्य काय? असा सवाल केला असता, इंदु मीलमध्ये साकारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात त्यांचा भ पुतळा बसविण्यात येणार आहे. मध्ये कोणताही आक्षेप राहू नये यासाठी मदत करा,अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी आपणास केल्याने जेव्हा जेव्हा त्याबाबत आपणास बोलावले जाईल तेव्हा तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना भेटत राहीन असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.