Home राजकीय उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे दत्तक ग्राम फेटरीत काँग्रेस-राकाँ आघाडीची दुसर्‍यांदा सत्ता

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे दत्तक ग्राम फेटरीत काँग्रेस-राकाँ आघाडीची दुसर्‍यांदा सत्ता

0

नागपूर-माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दत्तक ग्राम फेटरीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने सलग दुसर्‍यांदा सत्ता काबीज केली. थेट सरपंच निवडणुकीत आघाडीचे रवींद्र खांबलकर हे विजयी झाले.
नऊ सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस-राकाँ सर्मथित फेटरी विकास आघाडी पॅनलचे पाच सदस्य निवडून आले. सरपंच पदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते. परंतु मुख्य लढत काँग्रेस-राकाँ आघाडीचे उमेदवार रवींद्र खांबलकर (६५७) आणि भाजपचे सुरेश लंगडे (५९२) यांच्यात झाली. खांबलकर हे ६५ मतांच्या अंतराने निवडून आले. भाजप सर्मथित ग्रामविकास पॅनलचे वॉर्ड क्र. १ मधून तीन तर वॉर्ड क्र. २ मधून एक असे चार उमेदवार निवडून आले. काँग्रेस-राकाँ आघाडीचे वॉर्ड क्र. २ मध्ये दोन तर वॉर्ड क्र. ३ मधील तीनही असे एकूण पाच उमेदवार विजयी झाले. आशिष गणोरकर (३२४), ज्योती राऊत (२३८), हर्षा लंगडे (२२५), वकील डोंगरे (२0८), जितेंद्र पवार (२१५), वैशाली लंगडे (२२८), मुकेश ढोमणे (२८४), रेखा ढोणे (३५१) आणि मृणाली दोडेवार (४२५) या नऊ उमेदवारांनी बाजी मारली. गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राकाँ आघाडीच्या धनश्री ढोमणे यांनी भाजपच्या ज्योती राऊत यांचा ११0 मतांनी पराभव करून सरपंचपद खेचून आणले होते.

Exit mobile version