कॉंग्रेसच्या आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्षपदी सोनू नेताम

0
22
वाढदिवसाच्या शुभेच्छा

देवरी,दि.२०:- महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसच्या आदिवासी आघाडी सेलच्या वतीने देवरी तालुक्यातील घोनाडी /सर्रेगावचे सरपंच आणि काँग्रेस नेते सोनू नेताम यांची गोंदिया जिल्हा कांग्रेस आदिवासी आघाडी सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
गुरुवारी देवरी येथील आमदार कोरोटे भवनात आमदार सहसराम कोरोटे यांनी सोनू नेताम यांना नियुक्तीपत्र देऊन उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
घोनडी / सर्रेगावं ग्रामपंचायतीचे सरपंच सोनू नेताम हे यापूर्वी देवरी तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष होते. श्री.नेताम हे त्यांच्या साध्या व्यक्तिमत्त्वासाठी व लढाऊ शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी कांग्रेस पक्षाने दिलेली सर्व जबाबदारी यशश्वीरित्या पार पाडणार असल्याचे सोनू नेताम यांनी सांगितले.