गोरेगाव,दि.29- गोरेगाव बाजारसमितीवर भाजप काँग्रेस राकाँच्या किसान सहकार पॅनलने एकहाती विजय मिळविले होते.त्यानंतर आज 29 मे रोजी झालेल्या सभापती व उपसभापती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे गिरधारी बघेले यांची सभापती तर भाजपचे तेजेंद्र हरिणखेडे यांची उपसभापती पदावर बिनविरोध निवड झाली.या निवडणुकीत भाजपप्रणीत किसान सहकार पॅनलने 18 पैकी 16 जागा जिंकल्या होत्या.त्यामध्ये किसान सहकार पॅनलचे ग्रामपंचायत गटातून तेजेंद्र हरिणखेडे,नुमानचंद चौधरी,नरेंद्र रहागंडाले,महिला गटातून शशीताई फुंडे,अडते व्यापारी व हमाल गटातून गोपाल ठाकूर,योगराज पटले,राजेश ताराम, तर कैलास डोगंरे,गिरधारी बघेले,दसाराम साऊसकर (अविरोध),सेवा सहकारी गटातून किशोर गौतम,मोहन ठाकरे,योगराज पारधी,उकराम बिसेन,संजय भगत,संतोष रहागंडाले,अपक्ष महेंद्र ठाकूर तर सहकार परिवर्तन पॅनलच्या डिलेश्वरी तिरेले या महिला गटातून एकमेव विजयी झाल्या.आज झालेल्या सभापती,उपसभापती निवडणुकीनंतर भाजपच्या वतीने विजयोत्सव साजरा करीत बाजार समिती आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले.
गोरेगाव बाजार समिती सभापतीपदी गिरधारी बघेले तर उपसभापतीपदावर तेजेंद्र हरिणखेडेची निवड
वाढदिवसाच्या शुभेच्छा