Home राजकीय जिल्हा भाजपात नेत्यांची एकाधिकारशाही!

जिल्हा भाजपात नेत्यांची एकाधिकारशाही!

0

#सूडाच्या राजकारणाने नेत्यांबद्दल तीव्र नाराजी
#नेत्यांना आत्मचिंतनाची गरज

आमगाव : तालुक्यातील भारतीय जनता पक्ष उपराजधानीतील गड मानला जात असे पण येथील पुढाऱ्यांचे एकाधिकारशाही वृत्तीने “ऐकलाच चलो” धोरणेतून जिल्ह्यात नेत्यांबद्दल तीव्र नाराजी समोर आली आहे.
नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संधीसाधुपणा करीत एकाधिकारशाहीने युती करून मिळेल त्यात आपले भागविण्याचा प्रयत्न करण्यात आले.
आमगाव तालुक्याल अग्रगण्य बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप नेत्यांनी जिंकण्याचे संख्याबळ असून सुद्धा हरण्याची भीती बाळगून राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी करून अनेकांची तिकिटे कापली,यामुळे अनेक कार्यकर्ते यांनी जमेल तिथे गट पाडून लढले, यात अनेक दिग्गजांना घसरणीचा विजय मिळविण्यासाठी पैशांचा महापूर ओढवावा लागला .यातील निकालात मात्र भाजपातील एकाधिकारशाही विरुद्ध मात्र मतदार व कार्यकर्ते यात तीव्र नाराजी दिसून आली.अनेकांना दोन ते सव्वीस मतदानाच्या फरकाने विजय मिळविण्यात कसरत करावी लागली.तर संचालक पदासाठी निवड झाल्यानंतर पुन्हा मात्र संधी साधू नेत्यांचे वर्षानुवर्षे बाजार समितीत संचालक पदाधिकारी पदे मिळवून सत्ता काबीज करण्याचे मोह मात्र थांबले नाही, एक हाती एकाधिकारशाही कायम असावी यासाठी इतरांना डावलण्याचे कृत्य मात्र यातून पुढे आले.
जिल्ह्यात भाजपकडेआगामी पुढे लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन बांधणी सह केंद्र व राज्य सरकारच्या योजनांना पुढे करून मताधिक्य मिळवून घेण्याचे आवाहन आहे.तर कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक सर करणे आहे.परंतु संघटन मजबुती करण्याचे टाळून नेत्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्ते व पक्षातील सक्रिय नेत्यांना जिल्ह्यात पायबंद घालण्यासाठी पाऊल उचलले आहे.अश्या अनेक नेत्यांना जिल्ह्यात टाळण्यासाठी सरळ विरोधी भूमिका घेतली असल्याने यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.तर दुसरीकडे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी एकाधिकारशाही बाळगणाऱ्या नेत्याविरुद्ध भूमिका घेतली अश्या कार्यकर्त्यांना सुडाची भावना ठेऊन कार्यवाही होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे.
एकंदरीत भाजप मध्ये मी म्हणजे पक्ष अशी वृत्ती समोर येत असल्याने याची खंत मात्र कार्यकर्त्यांनी वेक्त केली आहे. जिल्ह्यातील एकाधिकारशाही नेत्यांमुळे अनेक निवडणुकांमध्ये पराजयाचा सामना करावा लागला आहे. मागील पदवीधर विधान परिषद निवडणुक, शिक्षक मतदार संघातील विधान परिषद निवडणूक , पूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या काही ठिकानातील उमेदवारांना पाडापाडी चे षडयंत्र कोणी रचले याचे मंथन पक्ष संघटनेला कडले आहे.त्यामुळे अश्या एकाधिकारशाही बाळगणाऱ्या नेत्यांनी कार्यकर्ते यांच्याशी सूड भावना टाळून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.तर पक्षातील जय पराजयावर मंथन करून आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version