भाजपचे माजी आमदार रामचंद्र अवसरे यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0
13

भंडारा- भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रामचंद्र अवसरे यांचे आज, शनिवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास लक्ष हॉस्पिटल, भंडारा येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, भाऊ असा मोठा परिवार आहे.

रविवारी दुपारी ३ वाजता पवनी येथील वैजेश्वर मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. रामचंद्र अवसरे २०१४ ते २०१९ या काळात भंडारा-पवनी विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून गेले होते.