छिपीयातून काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला सुरुवात

0
13

शहरासह प्रत्येक गावात यात्रा
गोंदिया : महाराष्ट्र काँग्रेस कमेटीच्या निर्देशानुसार राज्य सद्या जनसंवाद यात्रा सुरू आहे. त्याच अंतर्गत गोेंदिया जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने जिल्ह्यातही या यात्रेचे आयोजन होत आहे. त्याच अनुषंगाने गोंदिया विधानसभा क्षेत्रात जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष अशोक गुप्ता यांच्या मार्गदर्शनात या यात्रेला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील छिपीया येथून या यात्रेला प्रारंभ झाला असून क्षेत्रातील संपुर्ण गावात तसेच शहरात ही यात्रा जणार असून केंद्र शासनाच्या दुटप्पी धोरनांपाढाही वाचणार आहे.
काँग्रेस कमेटीच्या वतीने आयोजित ही यात्रा ५ सप्टेंबरपासून सुरू झाली असून १२ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. केंद्र शासनाने मागील ९ वर्षात बेरोजगारी, महागाई तर इतर महत्वाच्या मुद्यांवर दुर्लक्ष केल्याने सर्वसामान्य नागरिकांना हरिमोड झाला आहे. त्यातच राज्य शासनही त्याच धर्तीवर कार्य करीत असल्याने अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोंदिया तालुक्यातील छिपीया येथून या यात्रेला सुरुवात झाली असून ही यात्रा चिरामनटोला, परसवाडा, कोचेवाही, बनाथर, धामनगाव, सतोना, जिरुटोला, बाजारटोला, काटी आदी गावात या यात्रेचे जनसंवाद साधला आहे. काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अशोक (गप्पू) गुप्त यांच्या नेतृत्वात प्रदेश सचिव अमर वराडे, निलम हलमारे, तालुका अध्यक्ष सुर्यप्रकाश भगत, शहर अध्यक्ष जहीर अहमद, कृउबास उपसभापती राजकुमार पटले, अ‍ॅड. योगेश अग्रवाल, ओमप्रकाश भक्तीवर्ती, निवेश मिश्रा, डॉ. प्रकाश देवाधारी, आशिष चव्हाण, सचिन मेश्राम, विजय बहेकार, धन्नालाल नागरिकर, सुरेश चौरागडे, वसिम शेख, मनिष लांजेवार, निलेश लांजेवार, आनंद जतपेले, विशाल कटरे, दिपक बिसेन, दिनेश कोहळे, लखेश्वर नागफासे, अंकित चव्हाण, अंकित नागफासे, भागवत बाहे, उमेश हर्षी, लक्की रहांगडाले, सुरबंशी न्यायखरे, आकाश उके, धनराज शहारे, विशाल कटरे, लक्की पटले, कपील रंगारी, सिद्धार्थ पंधरे, राजेश भादुपोते, राहुल मेश्राम, ताराचंद माने, मुकेश पाटील, आनंद लांजेवार, आशिष उपवंशी, शिवा जतपेले, अशोक कावळे, योगेश भेलावे, नरेंद्र चिखलोंडे, आशिफ सैय्यद, पंकज पिल्ले, मुकेश येडे, विक्की नागफासे, दिनेश चौधरी, कुंदन मानकर यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले आहे.